उत्क्रांती आणि विकास होणे हा सृष्टीचा नियम आहे. काळ अनुरूप तो होतच राहणार. विकास हा संतुलित हवा. असंतुलित विकास हा विनाशाचे कारण बनतो. कपडे बदलले म्हणून संस्कार बदलत नसतात, संस्कार बदलू नयेत, विसरू नये. सृष्टीमध्ये उत्क्रांती होत गेली, अनेक जीव जातींचा विकास झाला, परंतु विज्ञानाला हे पकडता आले नाही की आत्मिक विकास देखील होत गेला. त्यातच संस्कृती सुरक्षित असते. हजारो वर्षांपूर्वी ज्या घरट्यात चिमणी राहत होती त्याच घरट्यात आज ही राहते. पशुपक्षी प्राण्यांचे जसे रंग रूप होते ते तसेच आहे. सूर्य पूर्वेला उगवत होता आजही पूर्वेला च उगवतो व पश्चिमेलाच मावळतो. फरक माणसात पडला. माणसाने विकासाचा वेगळा अर्थ घेतला. मग कला असो ,साहित्य असो, फिल्म इंडस्ट्री असो, कारखाने असो सर्वांचे स्वरूप बदलणार यात वाद नाही, बदल हे जीवंतपणाचे लक्षण असते. परंतु मूळ आत्मस्वरूपात बदल नको. हाच संस्कार अपेक्षित आहे. चार ठिकाणचे संस्कार गेले म्हणून जगातून संस्कार नष्ट झाले असे नव्हे. रुचिपालटावर आपले नियंत्रण असायला हवे. आणि हे काम साहित्याचे, सामाजिक आणि धार्मिक नायकांचे आहे. साहित्य समाजाला वळण देते. तसेच साहित्य निर्माण व्हावे. नवीन नृत्याचे विचित्र प्रकार आले. तरी स्पर्धेमध्ये लावणी सादर होतेच ना तितक्याच नजाकतीने. लोककलेचा ऱ्हास व्हायला नको. तसेच कलेच्या मूळ स्वरूपातही बदल नको. म्हणूनच विकास व्हावा परंतु तो संतुलित पद्धतीने. आज जगाच्या सोबत चालत असताना भौतिक विकासात आपला देश आणि आपण मागे राहता कामा नये. वैज्ञानिक विकास परम सीमेवर असताना त्यात आपलाही सहभाग असावा ही काळाची गरज आहे, ज्ञानवंतांची मोठी पिढी बाहेर देशात कामासाठी आणि उपजीविकेसाठी मोठ्या प्रमाणावर जाताना दिसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारतीय संशोधकांचे मोठे प्रमाण आहे. हा ज्ञानवंतांचा विज्ञानवंतांचा बाहेर जाणारा लोंढा थांबवला आला तर हाच विकास त्यांच्या माध्यमातून आपल्या देशात होईल. एक पिढी बाहेर जाऊन परत आपल्या देशात येते त्यावेळेस त्यांच्यामध्ये थोडासा बदल घडून आलेला असतो आणि त्यांच्या पुढची पिढीही त्या रंग रूपाची , त्या आवडी-निवडीची बनलेली असते. असाच पूर्वेकडील आपल्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा ऱ्हास होऊन त्यामध्ये हे सांस्कृतिक प्रदूषण होत आहे. म्हणूनच ज्या काही प्रमाणात आपल्याकडे विकास होत आहे त्याच प्रमाणात सांस्कृतिक संतुलन थोडेसे कमी झाले आहे की काय असे वाटते आणि आपलेही राहणीमानात, विचारात, वागण्यात पाश्चिमात्यकरण अधिकाधिक प्रमाणात होत असल्यासची मोठी भीती आहे आणि तसे प्रत्यक्ष दिसत आहे. कोणत्याही समस्येवर घाबरून जाऊन माघार घेतल्यापेक्षा त्याचा संघर्ष केला पाहिजे आणि त्याचे उपाय शोधून त्याप्रमाणे निराकरण केले पाहिजे. विकासही झाला पाहिजे, आपण जगाच्या मागे राहू नये परंतु आपली संस्कृती ही आपल्याला जपायची आहे.आपल्यात असलेला परस्पर आदर आपले संस्कार, आपली जीवनशैली, म्हणजेच आपली भारतीय संस्कृती सांभाळून आपल्याला हे सर्व करायचे आहे. यासाठीच तर आपण आपली पिढी या दृष्टीने घडवली पाहिजे. ही आपल्या प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. म्हणूनच धार्मिक, सांस्कृतिक शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे शैक्षणिक प्रक्रियेमध्ये, धोरणामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव होतो आहे की नाही हे प्रत्येक भारतीयांनी तपासण्याचे कर्तव्य आहे. पूर्वीच्या आणि आजच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये खूप फरक पडला. आज आपला स्वर्णीम इतिहास आणि जगामध्ये असलेली अद्वितीय अशी भारतीय संस्कृती ही किती प्रमाणामध्ये शालेय अभ्यासक्रमामधून प्रत्यक्ष दिसते ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीच्या मूल्यावर आधारित शिक्षणाचा अंतर्भाव शैक्षणिक अभ्यासक्रमात असायलाच हवा. त्यासोबतच आपण स्वतः आपल्या कुटुंबामध्ये पुढच्या पिढीवर आपला धर्म आणि आपल्या संस्कृतीनुसार संस्कार होत आहेत का नाहीत किंवा ते केले पाहिजेत आणि ते आपणच करायचे आहेत. ते आपलेच कर्तव्य आहे हे समजून केले पाहिजे. अजूनही काही भारतीय समाजामध्ये पुढच्या पिढीला लहान मुलांना धार्मिक शिक्षणाला पाठवले जाते, धार्मिक शिक्षणाची व्यवस्था असते त्यामध्ये संस्कृती जपल्या जाते आणि संस्कार होतातही परंतु हे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यातच पुढे भौतिकतेशी लढताना स्पर्धेच्या युगात जगताना या गोष्टींचा विसर पडतो. हेही लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी लेखाद्वारे असा आग्रह आहे की विकास व्हावा, आपण जगाच्या मागे नसावे. तांत्रिक विकास व्हावा, तंत्रज्ञान विज्ञान वैद्यकीय सर्व क्षेत्रांमध्ये आपण पुढे गेले पाहिजे. आपल्या प्रतिभेचा, विज्ञानवंतांचा, ज्ञानवंतांचा आपल्याच देशाला उपयोग व्हावा अशी ही योजना कशी अमलात आणली जाईल हा एक विचार व्हावा आणि या विकासासोबत संस्कृतीला न विसरता संस्कृतीचा हात धरून पुढे गेले पाहिजे म्हणूनच हे प्रकर्षाने प्रभावाने येथे मांडायचे आहे की विकास व्हावा परंतु तो संतुलित. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
- 'क्लोड एआय' (Claude AI) म्हणजे काय आणि ते कसे काम करते? जाणून घ्या खास फीचर्स!
- पावसाची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; २३ जूननंतर मान्सूनची आगेकूच वेगवान होणार.
- पुण्यात पाणी टंचाईचे संकट असताना गळतीचा कहर; शिवाजीनगरमध्ये व्हॉल्व्ह खराब असल्याने २५ हजार लिटर पाण्याची नासाडी!
महाराष्ट्र
- वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये कपात; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल, नाराजीचा सूर!
- माहितीच्या अधिकारावर गदा! 'नियम २०(३)' मुळे वकिलांच्या सहभागावर बंदी; निर्णयाविरोधात संताप, अण्णा हजारे घेणार भूमिका.
- पावसाची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; २३ जूननंतर मान्सूनची आगेकूच वेगवान होणार.
- पुण्यात पाणी टंचाईचे संकट असताना गळतीचा कहर; शिवाजीनगरमध्ये व्हॉल्व्ह खराब असल्याने २५ हजार लिटर पाण्याची नासाडी!
गुन्हा
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- दिल्ली: 'काळी जादू' करत असल्याच्या संशयातून डॉक्टरने केली घरकाम करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या; उपचारादरम्यान नैराश्यातून टोकाचे पाऊल.
- पुणे: कामशेत परिसरातील नायगाव येथील धाब्यावर महिलेवर जीवघेणा हल्ला आणि विनयभंग; पार्किंगमधील वाद विकोपाला.
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान केलं आहे.
पुणे-सातारा महामार्गावर टेम्पोची जोरदार धडक Pune Accident | पुणे-सातारा
देश विदेश
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.
- माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांचे सुपुत्र नरेश गुजराल सायबर फसवणुकीचे बळी; ७८ लाखांची लूट, पोलिसांनी ७० टक्के रक्कम गोठवण्यात यश.
- न्यूयॉर्क हादरलं! प्रसिद्ध 'टाईम्स स्क्वेअर'वर भीषण गोळीबार; गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांची पळापळ, थरारक व्हिडिओ व्हायरल



























Subscribe to my channel


