भंडारा: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुदैवाने बचावले!

Two Youths Drown in Wainganga River After Boat Capsizes! भंडारा: जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात एका खासगी बोटीला झालेल्या अपघातात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भंडारा तालुक्यातील करचखेडा
येथे घडली.

नेमकी घटना काय? करचखेडा येथील वैनगंगा नदीतील बेटावर सात तरुण अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ उरकून परतत असताना त्यांची बोट नदीच्या पात्रात उलटली. या अपघातात सातपैकी पाच तरुण पोहत कसेबसे नदीकाठावर पोहोचले,
मात्र दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. मृत तरुणांची नावे:कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय २६, रा. चांदणी चौक, भंडारा). पवन मुरली चौबे (वय ३४, रा. आंबेडकर वॉर्ड, भंडारा).

यापैकी कृष्णा बोकडे याचा मृतदेह सोमवारी सकाळी ११ वाजता आढळून आला आहे, तर पवन चौबे यांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *