मुंबई: पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) गटावर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत हे आपल्या सहकाऱ्यांना गिळणाऱ्या काँग्रेस नावाच्या 'अजगर'चे पिल्लू आहेत," असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी कोलकातामध्ये जाऊन आंदोलन करावं
ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ उभ्या ठाकलेल्या उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांनी खोचक सल्ला दिला आहे. "उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडावसं वाटत नाही, पण आता त्यांनी थेट कोलकाता गाठावे आणि ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून वर्षभर आंदोलन करावे. सत्तेसाठी हपापलेल्या संजय राऊतांनी आपल्या पक्षाच्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी दुसऱ्यांच्या राज्यात लुडबुड थांबवावी. एकनाथ शिंदे गेल्यानंतर तुम्हाला जाग येते, यातच सर्व काही समजते," अशी टीका बन यांनी केली.
काँग्रेस म्हणजे सहकाऱ्यांना गिळणारा अजगर
पश्चिम बंगालमध्ये 'इंडिया' आघाडीचे अस्तित्वच नव्हते, असा दावा करत बन म्हणाले की, "ही ध्येयधोरण नसलेली आघाडी आहे. काँग्रेस हा आपल्या सहकाऱ्यांना गिळणारा अजगर आहे. ज्या ज्या पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्यांचे अस्तित्व संपवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. संजय राऊत केवळ स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसची सुपारी घेऊन काम करत आहेत."
जरांगेंच्या सल्लागारांनी अर्धवट माहिती देऊ नये
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांवर भाष्य करताना बन म्हणाले की, "जरांगे यांच्या सल्लागारांनी त्यांना चुकीची माहिती देऊ नये. भाजपने यापूर्वीही ममता बॅनर्जींचा पराभव केला आहे. जरांगे पाटलांनी बंगालमध्ये जाऊन बॅनर्जींची दहशत पाहावी, मगच भाष्य करावे. फडणवीस हे कायद्याने चालणारे नेते आहेत. नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्याचे काम हे सरकारच करेल, त्यामुळे या संवेदनशील विषयात कोणीही राजकारण करू नये."
उबाठाचा 'दिवा' आता विझणार
संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले की, "दिवा विझताना मोठा होतो, त्याप्रमाणे राऊत सध्या फडफडत आहेत. उबाठा गटाचा हा शेवटचा दिवा आता कायमचा विझणार आहे, हे जनतेने ओळखले आहे. ममता बॅनर्जींनी गेल्या १५ वर्षांत बंगालमध्ये केवळ दादागिरी आणि गुंडगिरी केली आहे, आता जनतेने त्यांना घरी बसवून त्यांची जागा दाखवून दिली आहे. राऊत जर त्यांचे समर्थन करत असतील, तर त्यांनी प्रत्यक्ष बंगालमध्ये जाऊन आंदोलनात सहभागी व्हावे."
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




