समृद्धी महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महामार्गामुळं कमी होतील. शेतकऱ्यांना या महामार्गाचा फायदा होईल, असा दावा एमएसआरडीसीचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे केलाय. सध्या मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी १८ ते २० तास लागतात. समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, त्यावेळी मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) हे अंतर आठ तासांमध्ये गाठता येईल, असंही त्यांनी सांगितलं.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांसह समृद्धी महामार्गाची पाहणी केली. कोरोना काळात महामार्गाचे काम मार्गी लावले. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्याचं समाधान असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
महामार्गामुळं वेळ आणि इंधनाची बचत होईलच. याशिवाय हा मार्ग पर्यावरणपूरक असेल. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यावर प्रक्रिया होईल. या भागात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आधारित उद्योगधंदेही येतील. या सर्व गोष्टींचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होईल आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात होतात, त्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्या उपाययोजना आहेत? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग अपघातमुक्त असेल. यासाठी महामार्गावर विशेष प्रणाली असेल. नियमांचे पालन करुन वाहन चालवल्यास अपघात होणार नाही. मी स्वत: या महामार्गावर गाडी चालवलीये. हा चांगला अनुभव होता. १२० च्या पुढं गाडी चालवली तरी काही अडथळे आले नाहीत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




