पुणे : निवृत्त लष्करी आधिकाऱ्याने पत्नीसह स्वत:वरही झाडली पिस्तुलातून गोळी, दोघांचा मृत्यु

घोरपडी : गावातील बी टी कवडे रस्ता येथील सिताडेल सोसायटी मध्ये निवृत्त आर्मी ऑफिसरने पत्नीवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा ( वय ७४)आणि पत्नी चंपा बोरा (वय ६३) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार नैराश्यातून ही घटना घडली असावी असा अंदाज आहे.

पतीने पत्नी झोपलेली असताना तिच्या कपाळावर बंदुकीने गोळी झाडून स्वतः आत्महत्या केली आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते दोघेही घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मिळून आले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या मुलीने सोसायटीमध्ये फोन करून सोसायटीमध्ये आई फोन उचलत नाही अशी माहिती दिली. याबाबत माहिती घेतल्यावर दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस आल्यावर शेजारच्या घरातुन गॅलरीत प्रवेश करून दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी बेडरूममध्ये दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. शेजारी बंदूक पडलेली दिसून आली.

एक मुलगा व मुलगी दिल्लीत स्थायिक असून दुसरा मुलगा मुंबईत नोकरी करत आहे. मोठा मुलगा व जावई दोघे ही आर्मी मध्ये आहेत. लहान मुलगा खाजगी कंपनीमध्ये काम करत आहे. रात्री उशिरा लहान मुलगा पुण्यात आल्यावर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण सिंग बोरा नैराश्य ग्रस्त होते, त्यासंदर्भात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. यामधून त्यांनी पहिल्यांदा पत्नीचा खून केला त्यानंतर स्वतः आत्महत्या केली, असा अंदाज आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस अधिक करीत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *