Pune : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट गडद; ‘या’ भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार.

Pune : पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१५ एप्रिल, बुधवार रात्री १२:०० वाजल्यापासून ते १६ एप्रिल, गुरुवार रात्री १२:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीच्या कामांसाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे.

याशिवाय, १७ एप्रिल, शुक्रवार सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आधीच वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पाणीटंचाईचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणी साठवून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार:
नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र परिसर, पर्वती MLR/HLR/LLR टाकी परिसर, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व परिसर (चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, शिवणे इंडस्ट्रियल एरिया), एस.एन.डी.टी. परिसर, चतुश्रुंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल (वारजे फेज १ व २), गणपती माथा, जुने वारजे, भामा आसखेड जलकेंद्र तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, पाण्याचा योग्य व मर्यादित वापर करण्याची गरज अधोरेखित केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *