
Nagpur : पुणे आणि नागपूरकरांना दोन दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. आज आणि उद्या रेल्वेविभागात सुरू असलेल्या कामांमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दौंड-काष्टी रेल्वे विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामांसह आवश्यक अभियांत्रिकी व ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) संबंधित कामांसाठी रेल्वे प्रशासनाने वाहतूक ब्लॉक घेतला आहे. यामुळे 4 रेल्वे रद्द केल्या गेल्या आहेत.
नागपूर–पुणे आणि पुणे–अजनी मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे आणि नागपूरातील प्रवाशांना या वीकेंडला काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्या 26 जानेवारी सोमवारी आल्यामुळे लॉन्ग वीकेंडला अनेक नागरिक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण नेमकं वीकेंडलाच गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
|
Pune : राष्ट्रवादी नेत्या रूपाली ठोंबरेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय? जाणून घ्या |
कोणत्या गाड्यांवर परिणाम?
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 12136 नागपूर–पुणे एक्सप्रेस ही गाडी 24 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच 12135 पुणे–नागपूर एक्सप्रेस 25 जानेवारी 2026 रोजी रद्द राहणार आहे. याशिवाय, 22139 पुणे–अजनी हमसफर एक्सप्रेस 24 जानेवारी 2026 रोजी तर 22140 अजनी–पुणे एक्सप्रेस 25 जानेवारी 2026 रोजी रद्द करण्यात आली आहे.
दौंड–काष्टी रेलखंड हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक होते. सध्या सुरू असलेले दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि क्षमतेने सक्षम होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच, ओएचई आणि इतर अभियांत्रिकी कामांमुळे भविष्यातील तांत्रिक अडचणी कमी होऊन गाड्यांचे वेळापत्रक अधिक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या मते, ही रद्दीकरणे तात्पुरती असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच निर्णय घेण्यात आला आहे. कामकाज पूर्ण झाल्यानंतर संबंधित मार्गावरील गाड्यांचे नियमित वेळापत्रक पूर्ववत करण्यात येईल.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी प्रवासाचे नियोजन करताना गाडीची सद्यस्थिती अधिकृत रेल्वे चौकशी केंद्र, रेल्वेची वेबसाइट, मोबाइल अॅप किंवा हेल्पलाइनद्वारे तपासून घ्यावी. यामुळे अनावश्यक त्रास टाळता येईल. पर्यायी गाड्या किंवा मार्गांचा विचार करून प्रवास नियोजन करण्याचाही सल्ला रेल्वे विभागाकडून देण्यात आला आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





1 thought on “Pune Railway : लॉन्ग वीकेंडला प्रवाशांचे हाल; ब्लॉकमुळे पुणे–नागपूर मार्गावरील अनेक एक्सप्रेस रद्द, कोणत्या गाड्यांवर परिणाम?”