Satara : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला युवक 400 फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी; कास पठाराच्या मार्गावर दुर्घटना

Satara :  ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला एक युवक कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेलनजीक असलेल्या सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी झाला. दरम्यान, छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या तत्पर मदतीमुळे मध्यरात्री उशिरा त्याला दरीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

साताऱ्यातील कास पठाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ३१ डिसेंबरनिमित्त एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी युवक मित्रांसोबत गेला होता. मात्र, रात्रीच्या अंधारात हॉटेलजवळ असलेल्या दरीचा अंदाज न आल्याने तो थेट सुमारे चारशे फूट खोल दरीत कोसळला.

Pune Elections : पुण्यात शिवसेनेचा कारभार चव्हाट्यावर! आपल्याच उमेदवाराचा ‘बी’ फॉर्म गायब — नेमकं काय झालं?

या घटनेची माहिती मिळताच छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या कष्टाने आणि धाडसाने त्यांनी युवकाला जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढले.

क्षेत्रमाहुली येथील आदित्य कांबळे असे जखमी युवकाचे नाव असून सध्या त्याच्यावर साताऱ्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *