
Municipal Elections : ८ वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पण त्यालाही ग्रहण लागले, कारण जिल्हा परिषद आणि मनपा आरक्षणामुळे आयोगाचे वेळापत्रक कोलमडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील सर्वा निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार? याकडे कार्यकर्ते अन् महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयोगाकडून जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुका घेण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठीही तारखांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते.
सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नागपूरमधील राजकीय वातावरण तापलेय. अधिवेशनावर निवडणुकीचाही प्रभाव पडल्याचे दिसतेय. विरोधक आक्रमक झालेत, तर सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या आठवड्यात अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत राज्यात निवडणुकींची घोषणा होऊ शकते. २९ महानगरपालिकेसाठी १५ किंवा १६ तारखेंपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
|
|
नगर परिषद आणि नगर पंचायतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. उर्वरित नगरपरिषद-नगरपंचातीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २१ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच आयोगाकडून पुढच्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते. त्यासाठी आयोगाकडून सर्व चाचपणी पूर्ण झाली आहे. १४ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व मनपाच्या वॉर्डातील मतदार याद्या जाहीर होतील. त्यानंतर पुढील २ ते ३ दिवसांत मनपा निवडणुकीची घोषणा केली जाईल, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
मुबंई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि नागपूरसह राज्यातील महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुका एकत्रित होणार आहे. त्यासाठी राज्यात पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू शकते, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय. आयोगाकडून महापालिका निवडणुका अखेरच्या टप्प्यात घेण्यात येणार होत्या. त्याआधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. पण २० जिल्हा परिषदेतील आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेल्याने कोर्टाकडून ताशोरे ओढण्यात आले. त्यामुळे आता मनपा निवडणुका आधी घेण्यात येणार आहेत. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होतील. सत्ताधारी अन् विरोधकांकडून मनपा निवडणुकीची तयारी सुरू कऱण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या मनपामध्ये इच्छुकांचे अर्ज मागण्यात आले आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील महत्त्वाच्या पालिकेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कुणाची सत्ता येणार? याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
शहर
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात; एआय युगातील बदलांमुळे ४,८०० कर्मचारी कामावरून कमी!
महाराष्ट्र
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- अंगावर काटा आणणारा VIDEO: सिंहिणीनं पंजात पकडलं, पण हालचाल न करता पडून राहिल्याने गुराख्याचा वाचला जीव!
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम




























Subscribe to my channel

