
Pune to Rewa direct train with full schedule and stops : पुणेकरांना रेल्वे मंत्रालयाकडून खुशखबर देण्यात आला आहे. रिवा आणि पुणे या दरम्यान रविवार, ३ ऑगस्टपासून नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. महत्त्वाचे म्हणजे, रिवा आणि पुणे दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी ही पहिली ट्रेन आहे. पुणे-रिवा असा प्रवास करणाऱ्यांना आता आरामदायी प्रवास करता येणार आहे. या नव्या एक्सप्रेसचा नागपूरकरांना फायदा होणार आहे. पुणे-रिवा यादरम्यान धावणारी एक्सप्रेस नागपूरमध्ये थांबणार आहे. त्यामुळे पुणे-नागपूर असा प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.भारतीय रेल्वे नवीन पुणे -रिवा -पुणे एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे.
या दोन शहरांना जोडणारी ही (कनेक्टिव्हिटी) पहिली ट्रेन असेल. सध्या या दोन ठिकाणांदरम्यान अप्रत्यक्ष जोडणी उपलब्ध आहे. पण ह्या नव्या ट्रेननमुळे प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होईल. पुणे हे एक ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र आहे आणि महाराष्ट्रातील आळंदी, पंढरपूर, अक्कलकोट इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारे ठिकाण आहे. रिवा देखील ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र असून केओटी व बहुती धबधबे, व्हाइट टायगर सफारी यांसारख्या आकर्षणांसह एक पर्यटनस्थळ देखील आहे. ही ट्रेन महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा प्रदान करणार आहे.
या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट,नैनपुर, जबलपुर, कटनी, सतना ,रीवा ही शहरे परस्पर जोडली जातील. ही ट्रेन आरक्षित आणि अनारक्षित प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात येत आहे. ह्या ट्रेनमुळे नियमित प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच सुट्टीमध्ये प्रवासाला जाणारे प्रवासी यांच्यासाठीही उपयुक्त ठरेल. यामुळे पर्यटन आणि तीर्थयात्रेला चालना मिळेल तसेच व्यापार आणि उद्योगासाठी नव्या संधी निर्माण होतील.
पुणे-रिवा एक्सप्रेसची वेळ काय?
ट्रेन क्र. 20151 पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल.
ट्रेन क्र. 20152 रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
कोणकोणत्या स्थानकावर ही ट्रेन थांबणार -
दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना.
एक्सप्रेसची रचना कशी असेल?
२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन, असे सरंचना असेल.
Q
पुणे–रीवा एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?
A
पुणे–रीवा ही एक्सप्रेस रविवार, ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
Q
पुणे–रीवा ही ट्रेन कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार आहे?
A
दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी, सतना.
Q
पुणे–रीवा ही ट्रेन कोणत्या दिवशी धावेल?
A
पुणे–रीवा (गुरुवारी), रीवा–पुणे (बुधवारी) हे दोन फेऱ्या आठवड्यातून असतील.
Q
पुणे–रीवा या ट्रेनचे वैशिष्ट्य काय आहे?
A
ही ट्रेन पुणे–रीवा दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी पहिली ट्रेन आहे, ती वेगवान, आरामदायक असून पर्यटक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



