
Carnac Bridge Renamed as sindoor Bridge Mumbai : दक्षिण मुंबईतील १५० वर्षे जुन्या कर्नाक पूलाचे नामकरण सिंदूर उड्डाणपूल असे करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी 'सिंदूर' उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी हा ब्रिज महत्त्वाचा मनला जातोय.
१५० वर्षे जुन्या कर्नाक ब्रिजचे नाव का बदलले ? Why Carnac bridge renamed as sindoor bridge
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाक पूलाचे उद्घाटन केले, त्यासोबतच मुंबकरांसाठी या पुलाला नवीन नाव दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्नाक पूल आता सिंदूर पूल म्हणून ओळखला जाईल. हा पूल १५० वर्षांपासून कर्नाक पूल म्हणून ओळखला जात होता. आता त्याचे नाव सिंदूर पूल असेल. फडणवीस म्हणाले की, कर्नाक पूलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्याचा उद्देश म्हणजे कर्नाकच्या काळ्या इतिहासाचे डाग पुसणे आहे. कर्नाक हा एक ब्रिटिश गव्हर्नर होता, त्याने भारतीयांना फसवले आणि त्यांच्यावर अत्याचार केले होते. त्यामुळे या पूलाचे नाव बदलण्यात आले.
मुंबईतील ब्रिजसाठी सिंदूर या नावाचीच निवड का केली?
भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असेदेखील फडणवीस यांनी सांगितले.
दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी (South Mumbai East-West road connectivity bridge) अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा सिंदूर उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत पूर्ण झाले. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीची कार्यवाही आव्हानात्मक असून देखील अनेक अडथळ्यांवर मात करत महानगरपालिकेने यशस्वीपणे पूल उभारणी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सिंदूर ब्रिज कुठे आहे? नेमका कसा आहे ?
दक्षिण मुंबईत, मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला सिंदूर उड्डाण पूल जोडतो. सिंदूर पूल एकूण ३४२ मीटर लांबीचा आहे. त्यापैकी ७० मीटरचा भाग रेल्वे मार्गाच्या संरचनेवर उभारण्यात आला आहे. संपूर्ण पूल अत्यंत दर्जेदार, सुरक्षित आणि वाहतुकीस अनुकूल अशा पद्धतीने उभारण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक सुलभ होण्यास निश्चितच मदत होईल.
सिंदूर पूलाच्या पुनर्बांधणीचे फायदे काय ?
मुंबईच्या दक्षिण भागातील पी. डि'मेलो रस्त्यावरील बंदर परिसर आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांना रेल्वे मार्गावरून पूर्व-पश्चिम जोडणारा सिंदूर पूल हा एक महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे अनेक वर्षांपासून अडथळा येणारी पूर्व-पश्चिम दिशेतील वाहतूक आता सुकर होईल. सिंदूर पूल पुन्हा कार्यान्वित झाल्याने पी. डि'मेलो मार्ग आणि पुढे शहीद भगतसिंग मार्ग, विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्ग यांच्या जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या पुनर्बांधणीमुळे युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि काझी सय्यद मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होईल.
सिंदूर पूल नेमका कसा आहे ?
सिंदूर पूल हा मुंबईतील एक महत्त्वाचा पूल आहे. पूर्व-पश्चिम वाहतुकीला जोडणारा प्रमुख दुवा आहे. या पुलाची रचना आणि आकारमान यामुळे तो शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. संपूर्ण प्रकल्पाची लांबी ३४२ मीटर आहे, ज्यामध्ये पूल आणि त्याला जोडणारे रस्ते यांचा समावेश आहे.
संपूर्ण पूलाची (प्रकल्पाची) लांबी – ३४२ मीटर
लोहमार्गावरील पूल: आर.सी.सी. आधारस्तंभांवर (पीअर) प्रत्येकी ५०७ मेट्रिक टन वजनाचे, ७० मीटर लांब व २६.५० मीटर रुंद व १०.८ मीटर उंच असे दोन गर्डर, आर. सी. सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.
महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्ते : लांबी – २३० मीटर (पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस - १०० मीटर), आर. सी. सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



