
Pune : सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे एका खासगी कंपनीची ४१ लाख रुपयांची फसवणूक टळली. पोलिसांनी चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती बँकेला केली. पोलिसांच्या तत्परतेने तपास केल्याने खासगी कंपनीला रक्कम परत मिळवून देण्यात यश आले. याबाबत एका नामांकित खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार अधिकाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून संदेश पाठविण्यात आला होता. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशात चोरट्याने कंपनीतील व्यवस्थापकीय संचालक असल्याची बतावणी केली.
संदेश पाठविण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक व्यक्तिगत असल्याची बतावणी करण्यात आली. एका महत्त्वाच्या बैठकीत असून, तातडीने कंपनीच्या वित्त विभागातून ४१ लाख रुपये एका बँक खात्यात जमा करण्याची सूचना संदेशात दिली होती. त्यानंतर कंपनीच्या वित्त विभागाकडून बतावणी करणाऱ्या चोरट्याच्या खात्यात ४० लाख ९० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. फसवणुकीचा प्रकार उघडकीस झाल्यानंतर कंपनी प्रशासनाकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
|
|
त्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले हाेते. संंबंधित बँक खाते परराज्यातील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी परराज्यातील बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती केली. संबंधित कंपनीच्या बँक खात्यात पुन्हा रक्कम वळविण्यात आली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस कर्मचारी नवनाथ कोंडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे, सोनाली चव्हाण यांनी ही कामगिरी केली.
शहर
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
महाराष्ट्र
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!

























Subscribe to my channel




