Solapur : शिवरायांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद अखेर निकाली; ग्रामस्थांनी बैठकीत काढला तोडगा!

Solapur : माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून चार दिवसांनंतर गावातील तणाव निवळला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मोहोळ पोलीस ठाण्यात दोन्ही समाजांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अंजनगावातील धनगर समाज व मराठा समाजाच्या शिष्टमंडळांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजात एकमत झाले. त्यामुळे हा पुतळा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजप नेते व माजी आमदार राजन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही समाजाचे प्रतिनिधी एकत्र येऊन नव्या जागेचा शोध घेणार आहेत. या निर्णयामुळे गावातील तणाव कमी होऊन वातावरण शांत झाले आहे.

दरम्यान, या वादामुळे राज्यभर चर्चा रंगली होती. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आयजी सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तसेच इतर अधिकारी व समाजप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत ठरल्याप्रमाणे, ग्रामस्थ आणि मराठा समाज ज्या जागेची निवड करतील, त्या ठिकाणी पुतळ्याचे स्थलांतर करण्यात येणार आहे. शनिवारी नव्या जागेचा शोध घेण्यात येणार असून, त्या ठिकाणी पुतळा उभारणी व सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे मंजूर करणार असल्याची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करणार आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *