
Mumbai : उत्तरेत आलेल्या थंड लाटेचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नगरमध्ये सर्वात कमी ६.४, नागपुरात सात तर परभणीत ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने सोमवारी (१६ डिसेंबर) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन रांगांमध्ये पश्चिमी थंड वारे सक्रिय आहेत. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर, लेह लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. मध्य आशियातून थंड हवेचा झंझावात वेगाने भारताच्या दिशेने येत असल्यामुळे उत्तर भारत व्यापून थेट मध्य प्रदेशपर्यंत थंडीची लाट पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तापमान सहा अंशांपर्यंत खाली आले आहे.
|
|
राज्यात रविवारी नगरमध्ये ६.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. नगर खालोखाल जळगावात ७.९, पुण्यात ९.०, मराठवाड्यातील परभणीत ८.६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८.८, विदर्भातील नागपुरात ७.०, गोंदिया ७.२, वर्धा ७.४ आणि अकोल्यात ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागात किमान तापमान दहा अंशांच्या वर राहिले. किनारपट्टीवर कुलाब्यात २२.४, सांताक्रुजमध्ये १६.३ आणि डहाणूत १६.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
थंडीच्या लाटेचा इशारा
उत्तरेकडून वेगाने येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या काही भागांत थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (१६ डिसेंबर) गोंदिया, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, जळगावात थंडीची लाट किंवा लाटसदृश स्थिती निर्माण होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सोमवारीही राज्यातील अनेक भागांत थंडी वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येतील आणि किमान – कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल, असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी म्हटले आहे.
शहर
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
महाराष्ट्र
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
गुन्हा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

























Subscribe to my channel




