
Pune : खरीप हंगामात उत्पादित झालेल्या सोयाबीन, मूग आणि उडदाला हमीभावापेक्षा सरासरी ५०० रुपये कमी दर मिळत आहे. केंद्र सरकार विविध योजनांद्वारे शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्याची शाश्वती देत असले, तरीही अद्याप हमीभावाने खरेदी सुरू झालेली नाही.
मराठवाडा, विदर्भात खरिपातील शेतमालाची काढणी सुरू झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे अडीच – तीन महिन्यांत पक्व होणाऱ्या कडधान्याच्या काढणीला वेग आला आहे. केंद्र सरकारने खरिपातील मुगाला ८६८२ प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे, प्रत्यक्षात मुगाची विक्री सरासरी ७५०० रुपये दराने सुरू आहे. उडदाचा हमीभाव ७४०० रुपये प्रतिक्विंटल असून, उडदाला मिळणारा दर सरासरी ७००० रुपये आहे. सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये प्रतिक्विंटल आहे. पण, जेमतेम ४४०० रुपये दर मिळत आहे. खरीप हंगामातील शेतमालाची हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी दराने विक्री होत आहे.
|
Pune : राज्यात पुढील आठवड्यात दमदार सरी जाणून घ्या, कमी दाबाचे क्षेत्र कुठे तयार होणार |
देशात उत्पादित होणारी सर्व तूर, उडीद आणि मसूर केंद्र सरकार खरेदी करेल, असे जाहीर केले आहे. त्या शिवाय नुकतीच पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजनेला (पीएम – आशा) मंजुरी दिली आहे. सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची ही योजना आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळावा, असा योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारने मूल्य समर्थन योजना (पीएसएस) आणि मूल्य स्थिरीकरण निधी (पीएसएफ) या दोन योजनांचे एकत्रीकरण करून पीएम-आशा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदीचे संरक्षण मिळेल आणि शेतमालाच्या दरातील चढ-उतार टाळून शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यात येईल, असे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात विदर्भ, मराठवाड्यात अद्याप तरी सरकारी खरेदी सुरू झालेली नाही. हमीभावापेक्षा कमी दराने विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
सोयाबीन, उडीद, मूग या शेतमालाचे बाजारातील भाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा खूपच कमी आहेत. सरकारने शेतमालाची हमीभावाप्रमाणे खरेदी सुरू करावी अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
शहर
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात; एआय युगातील बदलांमुळे ४,८०० कर्मचारी कामावरून कमी!
महाराष्ट्र
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- अंगावर काटा आणणारा VIDEO: सिंहिणीनं पंजात पकडलं, पण हालचाल न करता पडून राहिल्याने गुराख्याचा वाचला जीव!
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम




























Subscribe to my channel

