
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) जनसन्मान यात्रेत अजित पवारांचा ताफा निघाला होता, त्यावेळी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे आलेल्या अजित पवारांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, तसेच त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शनं केली. भाजपाच्या या विरोधामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं आहे. सुनील तटकरेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांकडे उत्तर मागितलं आहे.
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
“माझ्या जिल्ह्यातही भाजपाचे नेते, मंत्री येतात. आम्ही त्यांच्या कार्यक्रमांवर कधीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम करत असेल तर त्याला सक्त ताकीद दिली पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.” असं परखड मत सुनील तटकरेंनी व्यक्त केलं.
|
|
“वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे पालकमंत्री आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाचे पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या पक्षांचे कार्यक्रम होत असतात. आम्ही कधी त्यावर आक्षेप घेत नाही. तसाच हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. हा कोणत्याही प्रकारचा शासकीय कार्यक्रम नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ( NCP ) जनसन्मान यात्रा आहे. त्यामुळे कोणीही गैरसमजातून किंवा राजकीय हेतूने अशी निदर्शने करू नये. घटक पक्षाने अशा प्रकारे काळे झेंडे दाखवू नये.”
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
अजित पवार हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांच्या दौऱ्याच्या फ्लेक्सवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो नाहीत, ते स्थानिक कार्यकर्त्यांचे ऐकत नाहीत असं आंदोलनाच्या वेळी आशा बुचके म्हणाल्या. अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांचा रोख अतुल बेनकेंकडे होता. त्यांच्या या आंदोलनावर रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “आशा बुचके यांनी अजित पवारांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्यापेक्षा त्यांचं म्हणणं मांडायला हवं होतं, दादांनी त्यांचे बोलणं ऐकून घेऊन त्यावर कृती केली असती.”
अमोल मिटकरी काय म्हणाले?
दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी भूमिका मांडली आहे, “जनसन्मान यात्रा हा आमच्या पक्षाचा ( NCP ) स्वतंत्र कार्यक्रम आहे. ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्यांनीही स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. आता आमचं म्हणणं हे आहे की भाजपा कार्यकर्त्यांनी असं का केलं? त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे.”
रोहित पवारांची भाजपावर टीका
या सगळ्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर टीका केली आहे. “भाजपाचं हे धोरण आहे. ते आधी बलशाली नेत्याला भाजपाशी हात मिळवणी करायला लावतात, त्यानंतर त्या नेत्याला कमकुवत करतात.”
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




