
Mumbai : राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे ‘अर्थपूर्ण’ काम एकीकडे जोरात सुरु आहे. मात्र त्याचवेळेस ग्रामीण आरोग्याची मदार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत वाईट असून जवळपास २३३ प्राथमिक आरोग्य केंद्र एक तर मोडकळीला आली आहेत वा धोकादायक म्हणून जाहीर झालेली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पावसाळ्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गळती होत असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी वा नव्याने बांधण्यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केले असले तरी या योजनेला म्हणावी तशी गती मिळताना दिसत नसल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे डॉक्टरांच्या निवासांची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याबाबत विचारही करण्यास आरोग्य विभागातील उच्चपदस्थ तयार नाहीत.
राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून राज्यातील सध्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्यात तसेच नवीन आरोग्य केंद्र कोठे स्थापन करण्याची गरज आहे ते निश्चित करण्यास काही महिन्यांपूर्वी आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी विभागाला सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने अहवाल तयार केला असून राज्यातील आरोग्य विभागाच्या १९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी तब्बल २३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीला आल्याचे वा धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय बहुतेक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण आरोग्याचा पाया असून गावखेड्यातील रुग्णांसाठी ही आरोग्य केंद्रे मोठा आसरा असतात. बहुतेक आरोग्य केंद्रे ही अत्यंत जुनी झालेली असून नव्याने या आरोग्य केंद्रांच्या इमारतींची बांधणी करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अहवालाची प्रत ‘लोकसत्ता‘कडे आहे.
|
|
ठाणे जिल्ह्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे मोडकळीला आली आहेत अथवा धोकादायक स्थितीत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये गळती होत असते. पालघरमध्ये सात, अमरावती येथे १२, रायगड येथे १३, पुणे येथील १० तर नागपूर येथील २६ प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती फारच दयनीय असून आरोग्य केंद्रांच्या बहुतेक इमारती या धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील २९ आरोग्य केंद्रांची पाहणीच झालेली नसल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी ५० ते १०० रुग्णांवर उपचार केले जातात. या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विस्तार व बळकटीकरण करण्याची गरज असताना त्याकडेही आजघडीला कोणी लक्ष देताना दिसत नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची दूरावस्था झाली आहे तर पावसाळ्यात आनेक आरोग्य केंद्रांमध्ये गळती होत असते, अशा परिस्थितीत रुग्ण तपासणीतही अडचणी येतात. येथे उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या निवासस्थानापासून अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचेही या केंद्रांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. धोकादायक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी नवीन केंद्र युद्ध पातळीवर उभारणे आवश्यक असून आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नव्याने करण्यात आले आहे तर काही ठिकाणी बांधकाम सुरु आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था दयनीय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र त्याकडे लक्ष देणाऱ्या आरोग्य संचलनालयातील वा मंत्रालयातील उच्चपदस्थांना वेळ नसल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणी वाढीव प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे त्या दृष्टीने आरोग्यमंत्री आढावा घेत आहेत. आरोग्य सेवेचा विस्तार करण्याचाही त्यांचा मनोदय आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयीन दुरुस्तीसाठी वेळेवर वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जात नाही. एवढेच नव्हे तर मोडकळीला आलेल्या वा धोकादायक झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही निधी मिळत नाही. आरोग्य विभागाला नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती आदी काहीही करायाचे झाले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे करावी लागतात. यात प्रचंड दिरंगाई होत असल्यामुळे आरोग्य विभागाअंतर्गत स्वतंत्र बांधकाम कक्ष निर्माण करण्याचा प्रस्तावही आरोग्य विभागाने तयार केला होता. मात्र त्याला सरकारची मान्यता मिळताना दिसत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले मात्र याठिकाणी डॉक्टरांच्या निवासाची दूरवस्था असून त्याबाबत ठोस पावले उचलली जाताना दिसत नाही. गंभीर बाब म्हणजे आदिवासी व अतिदुर्गम भागात काम करणार्या भरारी पथकातील २८१ डॉक्टरांना राहाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. भरीरी पथकात जवळपास ४० टक्के महिला डॉक्टर असून त्यांना कधी प्रथमिक आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी तर कधी उपकेंद्रात जसे मिळेल तसे राहावे लागते असे या डॉक्टरांनी सांगितले. एकीकडे चांगली दर्जेदार प्रथमिक आरोग्य केंद्र नाहीत तर दुसरीकडे तेथे वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांच्या निवासाची दूरावस्था आहे. याबाबत ठोस पावले उचलण्याऐवजी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांमधील खाटा ५० ते १०० पर्यंत वाढवून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे म्हणजेच बांधकामे करत सुटण्याचे ‘अर्थपूर्ण’ कामे जोरात सुरु आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

