पुणे : बॅकस्टेज आर्टिस्ट तरुणीवर दिग्दर्शकाकडून बलात्कार; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे: बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर कास्टिंग दिग्दर्शकाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात काल (३० मार्च, बुधवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित प्रेमचंद सीटलानी (वय ४०, रा. कळस) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एका तरुणीने फिर्याद दिली आहे.

ही युवती सिनेक्षेत्रात बॅकस्टेज आर्टिस्ट आहे तर, सीटलानी हा सन फिल्म्सचा कास्टिंग दिग्दर्शक आहे. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने २१ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केले. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. मुलीच्या अश्लील व्हिडिओ क्लिप बनवून त्या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती. तसेच शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे मुलीने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद आहे. आरोपी सीटलानी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *