
New Delhi : मुंबई इंडियन्सचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मा याने रविवारी आयपीएल लढतींचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीवर (ब्रॉडकास्टर) संताप व्यक्त केला. आपली वाहिनी अधिकाधिक व्यक्तींनी बघितली जावी, यासाठी क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यातील संवाद प्रसारित करणे योग्य नव्हे. क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा, अशा शब्दांत रोहित शर्मा याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहित शर्मा याने पुढे नाराजी व्यक्त करताना म्हटले की, क्रिकेटपटू सराव किंवा सामन्यादरम्यान सहकारी, मित्र यांच्याशी संवाद साधत असल्याचा क्षणही कॅमेऱ्यात कैद केला जात आहे. माझा संवाद रेकॉर्डिंग करू नका, असे सांगण्यात आल्यानंतरही त्या संवादाचे प्रसारण करण्यात आले. गोपनीयतेचे हे उल्लंघन आहे. वाहिनीला फक्त वेगळे काही तरी दाखवायचे असते. त्यामुळे ती घटना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते असे त्यांना वाटते; पण यामुळे चाहते, क्रिकेटपटू व क्रिकेट यांच्यामधील विश्वासाला तडा जाईल.
|
|
अभिषेक नायर याच्यासोबत संवाद
मुंबई इंडियन्स - कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये ११ मे रोजी आयपीएल लढत पार पडली. या लढतीदरम्यान रोहित शर्मा व कोलकताचा सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यामध्ये संवाद झाला. दोघांमधील संवादाचा हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. यामध्ये रोहित अभिषेकला म्हणतोय की, ‘‘येथे एक एक बाब बदलत चालली आहे; पण जे काही आहे, ते माझे घर आहे. जे मंदिर आहे ते मी बनवले आहे.’’ रोहित ज्या वक्तव्यावरून तो मुंबई इंडियन्स संघासंबंधित बोलत आहे हे समजत आहे. या संवादाच्या अखेर तो सांगताना दिसत आहे की, ‘‘हा माझा अखेरचा मोसम असणार आहे.’’ त्याच्या या वक्तव्यावरून तो मुंबई इंडियन्ससाठी यापुढे खेळणार नाही, असे स्पष्ट होताना दिसत आहे.
धवल कुलकर्णीसोबतचा संवाद
अभिषेक नायरसोबतच्या संवादाचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्यानंतर रोहित शर्मा भडकला. त्यानंतर लखनौ सुपर जायंटस्विरुद्धच्या लढतीआधी रोहित शर्मा धवल कुलकर्णी याच्याशी संवाद साधत होता. त्यावेळी रोहित शर्माने हात जोडूने ब्रॉडकास्टर यांना ऑडिओ बंद करण्याची विनंती केली. त्यामध्ये तो बोलताना दिसत आहे की, ‘‘भाई ऑडियो बंद करो. एक व्हिडीओने मेरी वाट लगा दी.’’
पुढच्या आयपीएलमध्ये संघ बदलणार?
मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या मोसमात रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. मुंबईच्या चाहत्यांना ते आवडले नाही. प्रत्येक लढतीदरम्यान तीव्र विरोध होताना दिसत होता. रोहित शर्मालाही हे आवडले नसावे. त्याच्याशी संवाद न साधता थेट निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे. यामुळे तो पुढल्या मोसमापासून संघ बदलणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. येत्या वर्षअखेरीस आयपीएलला मोठा लिलाव होणार आहे. बरीच वर्षे मुंबईशी जोडून राहिलेला रोहित पुढल्या मोसमात कोणत्या संघासोबत खेळतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र, याला अद्याप बराच अवधी आहे. तोपर्यंत संघ मालकांकडून रोहितची मनधरणी करण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला




























Subscribe to my channel
