
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरूच असून चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर रात्रीस खेळ चाले, असाच प्रचार होताना दिसत आहे. पक्षाचे नेते व पदाधिकारी घरोघरी भेटी देऊन, कार्यकर्ते व मतदारांना बुथ केंद्रावर येऊन मतदान करण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र, मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर शहरातील जुना वाद उफाळून आल्याने दोन गटांत राडा झाला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याचं पाहायला मिळालं. जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फोडण्यात आले असून एका स्कार्पिओ वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीत स्कॉर्पिओ कारच्या पाठिमागील व समोरील काचा फोडण्यात आल्या आहेत. अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
|
Arvind Kejriwal : चीनने कब्जा केलेली जमीन परत घेणार; केजरीवाल यांच्या १० गॅरंटी |
दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्यातच, मंगलगेट परिसरातील राड्याची माहिती मिळताच, याठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
लंके विरुद्ध विखे पाटील
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 13 मे रोजी मतदान होत असून महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत आहे. खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना येथील मतदारसंघात आहे. त्यामुळे, निलेश लंकेंनी खासदार होण्याचा निश्चिय केला आहे, तर अजित पवारांनी पारनेरमध्ये येऊन, तू कसा खासदार होतो तेच बघतो म्हणत सुजय विखेंना निवडून देण्याचं आवाहन नगरकरांना केलं आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात चांगलीच चूरस निर्माण झाली आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




