Baramati News : बारामतीतील व्यापाऱ्यांकडून शरद पवार यांचा मेळावा रद्द

Baramati : शहरातील व्यापाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे, हे माहिती नाही. व्यापारी मेळावा रद्द व्हावा, ही बाब दुर्दैवी आहे. गेल्या पन्नास वर्षांत असे कधीच घडले नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमूद केले.

बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्यात डॉक्टर व वकीलांसमवेतच व्यापाऱ्यांचाही मेळावा नियोजित होता. मात्र, ऐनवेळेस व्यापारी वर्गाने मेळावा घेणे शक्य नसल्याचे पत्र शरद पवार यांना दिले.

Pune Metro : पुणे मेट्रोच्या ३ हजार ७५६ कोटींच्या कामांना मंजूरी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

बारामतीत वकिलांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी ही बाब बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘‘बारामतीतील व्यापाऱ्यांना नेमकी कशाची चिंता वाटते आहे, हे समजत नाही. आजवर व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत. आज अचानकच मेळावा रद्द झाल्याचेच पत्र मला दिले. गेल्या पन्नास वर्षांत असे कधीच घडले नाही.त्यांना कसली तरी चिंता वाटत असावी व मेळावा न घेतलेलाच बरा, असेही वाटले असावे. व्यापारी मंडळींनी समोरच्यांचे ऐकूनच घ्यायचे नाही असे ठरवले, याचा खेद वाटतो.
दरम्यान, दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार यांना बारामती व्यापारी सन्मानाने त्यांचे आगामी वर्षांचे आडाखे व बाजारपेठेची स्थिती यांची माहिती घेण्यासाठी आवर्जून बोलावत होते.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *