
Sugarcane FRP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊसाची एफआरपी 25 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. ही वाढ मोदी सरकारने केलेली सर्वाधिक वाढ आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारनं निवडणुकीपूर्वी देशातील 5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. हे 5 कोटींहून अधिक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सरकारने बुधवारी 2024-25 हंगामासाठी ऊसाची एफआरपी 25 रुपयांनी वाढवून 340 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे.
|
Mumbai : पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे करणार उद्घाटन |
ऑक्टोबरपासून नवीन उसाचा हंगाम सुरू होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ऊसाची भाववाढ करण्यात आली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाच्या वाजवी आणि लाभदायक किमतीत (FRP) 10.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. मूळ दर 340 रुपये प्रति क्विंटल मंजूर करण्यात आला आहे. ते म्हणाले की, 'आतापर्यंतचा हा उच्चांक आहे, तो चालू हंगामाच्या 2023-24 च्या उसाच्या एफआरपीपेक्षा आठ टक्के अधिक आहे.
नवीन एफआरपी उसाच्या निश्चित फॉर्म्युल्यापेक्षा 107 टक्के अधिक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ते म्हणाले की, भारत देशात उसाला सर्वाधिक किंमत दिली जात आहे. सुधारित एफआरपी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
अधिकृत निवेदनानुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा पाच कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी (कुटुंबातील सदस्यांसह) आणि साखर क्षेत्राशी संबंधित लाखो लोकांना होणार (FRP For Sugarcane) आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाचा येणाऱ्या निवडणुकीच्या काळात मोठा फायदा होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
शहर
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुणे: पाटील इस्टेट ते संचेती हॉस्पिटल रस्ता पूर्ववत सुरू करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार) मागणी
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
महाराष्ट्र
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
- पुणे: भरधाव 'पीएमपी' बस दुकानात शिरली; चालकाचा 'ब्रेक फेल'चा दावा फोल?
गुन्हा
- पुणे पोलिसांचा हिसका: खंडणी मागणाऱ्या गुंडांची पिंपरी-चिंचवडमध्ये धिंड; परिसरात दहशत पसरवणाऱ्यांना अद्दल घडवली
- अमरावती रेशन घोटाळा: कोट्यवधींच्या धान्य अपहारप्रकरणी दोन पुरवठा निरीक्षकांवर गुन्हे दाखल; गाडगेनगर पोलिसांत एफआयआर
- फलटण (सातारा): सावकारी पाश आणि मानसिक छळाने घेतला बळी; फलटणमधील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या, ६ जणांवर गुन्हा दाखल
- मुंबई: "हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच आवडतात"; अश्लील व्हिडिओ पाठवून तरुणीला त्रास देणाऱ्या अशरफला बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




