
Pune News : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.
यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल पुरुष आणि महिला, पुणे शहर पोलीस आयुक्तालय परीमंडळ 1 ते 5, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 व 2, लोहमार्ग (महिला), गृहरक्षक दल, वनविभाग पुरुष व महिला, वाहतूक विभाग दुचाकीस्वार, डायल 112 वाहन, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका 108, बालभारती, अंमली पदार्थ शोधक श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर दर्शन दुगड यांनी केले.
|
Maharashtra Politics : 'आम्ही सर्व प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात, एकत्र लढा देऊ: बाळासाहेब थोरात |
यावेळी महाळुंगे पोलीस ठाण्याचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर तसेच येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सुभेदार सतिश बापुराव गुंगे, नामदेव संभाजी भोसले, हवालदार नवनाथ सोपान भोसले यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शहीद नायक बालाजी डुबुकवाड यांच्या पत्नी श्रीमती अर्चना डुबुकवाड यांचा महाराष्ट्र शासनातर्फे ताम्रपट देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा- 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरावर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी या गावाला प्रथम, पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि चांबळी या गावांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अजित पवार यांच्या हस्ते एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
शहर
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
- कोविडनंतर ऑक्सिजन प्लांट 'थंडावले'; कोट्यवधींच्या सार्वजनिक गुंतवणुकीचे नक्की काय झाले?
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- पुण्यात माणुसकीला काळीमा! १० लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
- कोविडनंतर ऑक्सिजन प्लांट 'थंडावले'; कोट्यवधींच्या सार्वजनिक गुंतवणुकीचे नक्की काय झाले?
- पुण्यात माणुसकीला काळीमा! १० लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल!
- ६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!

























Subscribe to my channel




