एन. रघुरामन यांचा कॉलम:हृदयस्पर्शी कथा सांगितल्या गेल्या नाही तर हृदयद्रावक घटना घडत राहतील

4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मी शालेय जीवनात दयाळू शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाढलो. शिवाय प्रौढ झाल्यावरही मी त्यांच्या दयाळूपणाच्या कथा ऐकल्या आहेत. ‘द लेटर्स इन द ड्रॉवर’ ही अशीच एक कहाणी आहे. वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या पंधरा दिवसांनी अरुण त्यांच्या खोलीत गेला. कारण नातेवाइकांची ये-जा वाढली होती. खोलीत जुन्या कागदाचा वास येत होता. खिडकीच्या जवळील डेस्कवर वर्षानुवर्षे उत्तरपत्रिका तपासल्याचे शाईचे डाग होते. जुने शैक्षणिक गोषवारे एका कोपऱ्यात पडले होते. दुसऱ्या कोपऱ्यात न वापरलेल्या वह्या पडल्या होत्या. 40 वर्षांचा दिवा बाहेरून फिकट दिसत होता. पण त्याचा प्रकाश तेजस्वी होता. अरुण त्याच्या वडिलांचा शिक्षक म्हणून असलेल्या कारकिर्दीचा विचार करू लागला. त्याने टेबल खालचा ड्रॉवर उघडला. त्यात फिकट लाल धाग्याने बांधलेल्या लिफाफ्यांचे एक बंडल होते. त्याने उत्सुकतेने धागा उघडला आणि पहिले पत्र वाचले. हस्ताक्षर थोडेसे गोंधळलेले होते. पण ते मनापासून लिहिले होते- “आदरणीय सर, तुम्हाला कदाचित मी आठवत नसेन. नववीत दोनदा गणितात नापास झाला होतो. मी तोच मुलगा आहे. तेव्हा मी शाळा सोडून माझ्या काकांच्या दुकानात काम करण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही आमच्या घरी आलात आणि माझ्या आईला सांगितले की एक अपयश जीवनाला ठरवू शकत नाही. आज मी अभियंता आहे. परंतु मला निराशा वाटते तेव्हा तुम्ही सांगितलेली ही गोष्ट आठवते. ’ अरुण क्षणभर थांबला. मग त्याने रात्रभर प्रत्येक पत्र उघडण्यात आणि वाचण्यात घालवली. दुसऱ्या पत्रात त्याचे वडील एका विद्यार्थिनीच्या वडिलांना समजावण्यासाठी कसे पायी गेले याचे वर्णन त्याने वाचले. तिसऱ्या पत्रात कुटुंबातील कठीण काळात त्यांनी शाळेची फी कशी भरण्याची ऑफर दिली याचेही वर्णन केले आहे. या शेकडो पत्रांनी त्याच्या वडिलांचे उत्तम जीवन समोर आले.

त्या दिवशी अरुणला एक धडा मिळाला. त्याला जाणवले की खरा वारसा संपत्ती, पदाचा किंवा सार्वजनिक मान्यतेवरुन मोजला जात नाही. खरे तर तो याच्या मागे धावत होता. शांतपणे आपला वेळ, सहानुभूती आणि विश्वास इतरांना देतात. अशा लोकांचा प्रभाव सर्वात स्थिर असतो. इतरांपेक्षा आपल्याला उंचावर नेले जाते तेव्हा महत्त्वाकांक्षेचा व्यापक उद्देश पूर्ण होत नाही. एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा वारसा म्हणजे संपत्ती किंवा पद नाही तर एखाद्यामध्ये आपले जीवन महत्त्वाचे आहे, असा विश्वास निर्माण करणे यालाच महत्त्व आहे.

मला ही कहाणी जालंधर ‘भास्कर’मध्ये नववीच्या एका विद्यार्थिनीने लिहिलेले ह्रदयद्रावक पत्र वाचताना आठवली. मी भुविकाबद्दल हृदयद्रावक बातमी वाचली. तिला पीनट बटर खूप आवडायचे. गेल्या शनिवारी ती तिच्या शेवटच्या प्रवासाला निघाली होती. तेव्हा तिची आई पीनट बटरचा एक बॉक्स घेऊन आली आणि तिला ते खायला घालताना म्हणाली, हळूहळू घे. शेवटचे .” हे शब्द ऐकून तिथे कुणीही अश्रू रोखू शकले नाही. आई पीनट बटरचा बॉक्स स्मशानभूमीत घेऊन जात असताना संपूर्ण जालंधर शहर रडले. जणू काही भुविका कधीही तिच्या आवडत्या पदार्थाची मागणी करू शकते. यापूर्वी 14 वर्षांची मुलगी सीसीटीव्हीमध्ये एकटी चालताना दिसली होती व काही मिनिटांनंतर ती एका उच्च-सुरक्षा निवासी संकुलात मृत आढळली. पोलिस या रहस्यमय प्रकरणाचा तपास संशयास्पद आत्महत्या म्हणून करत आहेत, तर कुटुंबीय याला हत्या म्हणत आहेत. मुलीच्या टेनिस प्रशिक्षकाला तिच्या टेनिस किटमध्ये एक सुसाइड नोट सापडल्याचे वृत्त आहे. त्यात लिहिले होते, “मी विज्ञान आणि गणितात नापास झाले. मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही. अलविदा.’ दुर्दैवाने समाजाने एका नवोदित लॉन टेनिस खेळाडूला गमावले. तिने सलग दोन वर्षे विभागीय स्तरावर कांस्यपदक जिंकले होते. कुटुंबाने त्यांची लाडकी मुलगी गमावली.

मोबाइलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

मोबाइलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

QuoteImage

फंडा असा की मुलांना एक गोष्ट नक्की सांगा. यशस्वी जीवनाचे मोजमाप एखाद्या व्यक्तीने किती कामगिरी किंवा गुण मिळवले यावरून नव्हे तर तो जगाला काय देतो यावरून होत असते. उदाहरणार्थ- अरुणच्या वडिलांनी समाजाला दिले तसे.

QuoteImage

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *