लोणी काळभोर : महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या ८४६ पोलिस अधिकाऱ्यांना सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तांतर्गत येत असलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३ पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.
भागवत गौतम शेंडगे, जयंत दत्तात्रय हंचाटे व नितीन बाबुराव शिंदे अशी पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१२ ला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत शेंडगे, हंचाटे आणि शिंदे उत्तीर्ण झाले. त्यांनी नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात २०१३-२०१४ ला प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर भागवत शेंडगे यांची मुंबई शहर, जयंत हंचाटे यांची पुणे ग्रामीण तर नितीन शिंदे गडचिरोली विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर प्रथम सामील झाले. गेल्या काही दिवसांपासून ती रखडलेली होती. अखेर राज्याचे पोलिस महासंचालक यांच्यावतीने मंगळवारी रात्री उशिरा पदोन्नती चे आदेश काढण्यात आले.
भागवत शेंडगे यांचा जन्म विठ्ठलवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. शेंडगे हे २०१४ ते २०१९ पर्यंत मुंबई शहर पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. पुणे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. जयंत हंचाटे यांचे मूळ गाव सोलापूर शहर आहे. हंचाटे यांनी ३ वर्ष पुणे ग्रामीण पोलीस दलात तर २ वर्ष मुंबई शहर पोलीस दलात कामकाज केले. त्यांची मुंबई लोहमार्ग विभागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.
दरम्यान, नितीन शिंदे यांचे मूळ गाव वडळे (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) हे आहे. त्यांनी गडचिरोली विभागात २०१४ ते २०१८ पर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर शिंदे २०१८ पासून पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची कोल्हापूर परीक्षेत्रामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




