
Barsu Refinery : बारसू परिसरातील ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची गुरुवारी राजापूरात बैठक झाल्यानंतर प्रकल्पाला विराेधक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. हा प्रकल्प नकाेच हे सांगण्यासाठी आज (शुक्रवार) पून्हा बारसूच्या माळरानावर प्रकल्प विराेधी गट एकत्र जमणार आहे. दरम्यान आमच्या आंदाेलनात काेण आडवं आले तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आंदाेलक महिलांनी दिला आहे.
बारसू रिफायनरीसाठी सर्वेक्षणाचा आजचा चौथा दिवस आहे. बोरच्या माध्यमातून बारसू सड्यावर माती परीक्षण केले जात आहे. पोलिसांचा बेस कॅम्प सर्वेक्षणाच्या ठिकाणी बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी बोरिंगचे काम दिवस-रात्र सुरू आहे. हा सर्वे लवकर व्हावा यासाठी प्रशासनाच्यावतीने हालचाली करण्यात येत आहेत.
राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला पंचक्रोशीतील अनेक गावांनी विरोध दर्शवलेला आहे. मात्र तरीही प्रशासनाने प्रकल्पासाठी सर्वे सुरू केल्याने या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने गुरुवारी प्रकल्पाला समर्थन देणाऱ्या आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्या निवडक प्रतिनिधींची बैठक घेतली.
या बैठकीबाबत खासदार विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. राऊत म्हणाले आम्ही याबाबत आक्षेप घेतला हाेता. जाेपर्यंत जाणकर कार्यकर्त्यांचे याबाबतचे मुद्दे समजून घेत नाहीत ताेपर्यंत बैठकीला अर्थ नाही. अनेकांना तडीपार केले गेले. त्यामुळे बैठक म्हणजे केवळ फार्स असल्याचे विनायक राऊत यांनी नमूद केले.
आज खासदार विनायक राऊत हे आंदाेलकांची भेट घेण्यासाठी राजापूरात आले. राजापूर सर्किट हाऊसच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत यांची अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट घेतली. त्यांच्यासमवेत चर्चा केली. पाेलिसांनी मोर्चाला न जाण्याचं आवाहन खासदार राऊत यांना केले आहे.
रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ आज बारसूच्या माळरानावर धडकणार आहेत. या संपूर्ण परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. ठिकठिकाणी पोलीस चौकी उभ्या करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. प्रसार माध्यमांना रोखण्यासाठी देखील पोलीसांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
आंदाेलकांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रणनितीनूसार (गनिमी कावा) माळरानावर पाेहचू. आम्हांला काेणी आडवलं तर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. ही लाेकशाही आहे की ठाेकशाही आहे असा सवालआंदाेलकांनी सरकारला विचारला आहे.
आमचा हक्क मिळावा यासाठी आम्ही लढणार. आम्ही शेवटपर्यंत लढा देणार असे महिला आंदाेलकांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीचा विराेध असताना देखील जबरदस्ती सुरु आहे. उदय सामंत यांना लाेकशाही काय असते हे दाखवून देऊ असेही आंदाेलकांनी स्पष्ट केले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




