
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे १५० रस्त्यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षात या रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी, खडीकरण, डांबरीकरण किंवा साधा मुरूम टाकण्याचे एकही काम झालेले नाही. यासाठी कोण्या लोकप्रतिनिधीने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यानेही काम करण्याची शिफारस केली नसल्याचे उघडकीस आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात तीन प्रकारचे रस्ते असतात. यामध्ये प्रजिमा (प्रमुख जिल्हा मार्ग), इजिमा (इतर जिल्हा मार्ग) आणि ग्रामीण रस्ते (व्हिलेज रोड) असे तीन प्रकारचे रस्ते असतात. प्रमुख जिल्हा मार्ग म्हणजे एका तालुक्याचे ठिकाण दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारे, मोठ्या गावांना किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणारे रस्ते हे प्रमुख जिल्हा मार्ग असतात.
प्रमुख जिल्हा मार्ग वगळून तालुकांतर्गत विविध गावांना जोडणारे मोठे रस्ते हे इतर जिल्हा मार्ग असतात आणि इतर जिल्हा मार्गापासून गाव किंवा वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांना ग्रामीण रस्ते किंवा गाव रस्ते म्हणतात. असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांची कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात. इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची कामे ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जातात. यामध्ये नवीन रस्त्यांची निर्मिती करणे, कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करणे, पक्का रस्ता करण्यासाठी रस्त्याचे खडीकरण,
डांबरीकरण करणे, किंवा केवळ मुरूम टाकून रस्त्याचे सपाटीकरण करणे, आदी कामे केली जातात. याशिवाय पूर्वी खडीकरण किंवा डांबरीकरण केलेले रस्ते खराब झाले असल्यास, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यास, अशा रस्त्यांची दुरुस्ती केली जाते किंवा खड्डे बुजविले जातात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत दरवर्षी नियमितपणे ही कामे केली जातात.
दरम्यान, या रस्त्यांची नवीन किंवा डागडुजीची कामे असोत, यासाठी कोणी ना कोणी लोकप्रतिनिधी शिफारस करत असतो. मग कधी खासदार, कधी आमदार, कधी जिल्हा परिषद अघ्यक्ष, तर कधी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य,
पंचायत समिती सदस्य आदी लोकप्रतिनिधी ही शिफारस करत असतात. ज्या रस्त्यांच्या कामांची कोणीच शिफारस करत नाहीत, अशा रस्त्यांची कामे संबंधित विभागांचे अधिकारी स्वतःहून कृती आराखडे तयार करत असतात. परंतु या १५० रस्त्यांची ना कोणत्याही लोकप्रतिनिधीने, ना कोणत्याही विभागाने, ना कोणत्याही अधिकाऱ्याने साधी शिफारसच केली नसल्याचे आढळून आले आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सापडले रस्ते
जिल्ह्यातील किती रस्त्यांच्या कामांची आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने किंवा अधिकाऱ्याने शिफारस केलेली नाही, अशा रस्त्यांची संख्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागितली होती. परंतु अशी काही नोंद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर अशा रस्त्यांचा शोध घेण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला. या आदेशानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक तालुक्यात सरासरी १५ ते १७ रस्ते सापडले आहेत.
पुणे जिल्हा संक्षिप्त माहिती
-
पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ --- १५ हजार ६६४ चौरस किलोमीटर
-
जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या --- १३
-
जिल्ह्यातील एकूण महसुली गावे --- १८७८
-
एकूण ग्रामपंचायती --- १४०७
-
जिल्ह्यातील ग्रामीण घरांची संख्या --- ६ लाख २५ हजार ४२३
-
इतर जिल्हा मार्गांचे एकूण अंतर --- १ हजार ८७५ किलोमीटर
-
ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी --- ९ हजार ६३९ किलोमीटर
शहर
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
महाराष्ट्र
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
























Subscribe to my channel



