
Ahmednagar : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी सांगली , नाशिक, नागपूरमध्ये शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी पुण्यातील माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि कारचा अपघात झाला होता. त्यानंतर आता अहमदनगरमध्ये शिवशाही बस आणि स्कुलबसचा अपघात झाल्याची घटना घडली. लोणी बाभळेश्वर रोडवर ही घटना घडली आहे. या अपघातात ४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती हाती आलीआहे.
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात शिवशाही बस आणि स्कुलबसचा अपघात झाल्याची घटना घडली. शिवशाहीने स्कुलबसला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे . लोणी बाभळेश्वर रोडवर ही घटना घडली आहे.
या अपघातात स्कुलबसमधील चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात शिवशाही बस रस्त्यावरून जात होती. लोणी बाभळेश्वर रोडवर शिवशाही बसने अचानक स्कुलबसला धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस स्कुलबसला धडकल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे.
हा अपघात शिवशाही बसचे चालक खंदारे यांच्याकडून झाला आहे. या अपघातानंतर खंदारे यांनी बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती दिली. तर ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बस चालक खंदारे यांच्याकडून अपघात झाल्याची आरोप पालक वर्ग करत आहे. या अपघातानंतर लोणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर पोलीस या अपघाताचा तपास लोणी पोलीस करत आहेत.
दरम्यान, काल नागपूरमध्ये धावत्या शिवसाही बसला भीषण आग लागली होती. या आगीत बस जळून खाक झाली होती. या बसमधून १६ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते वाचले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीत काही प्रवाशांचे सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे.
शहर
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

