
Mumbai-Pune Expressway : 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा प्रवास आणखी महागणार आहे. कारण 1 एप्रिल 2023 पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Pune Expressway) टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं.
पुणे (Pune News) मुंबई (Mumbai News) या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2030 पर्यंत पुणे-मुंबई प्रवासासाठी टोलचे दर खालीलप्रमाणे :
| वाहन | आत्ताचे दर | 1 एप्रिलपासूनचे दर |
| चारचाकी | 270 | 320 |
| टेम्पो | 420 | 495 |
| ट्रक | 580 | 685 |
| बस | 797 | 940 |
| थ्री एक्सेल | 1380 | 1630 |
| एम एक्सेल | 1835 | 2165 |
वेग सुसाट मात्र अपघात फारच
दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो, मात्र त्याच तुलनेत या मार्गावर अपघाताची मालिकादेखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारल्या जात आहे.
विनायक मेटेंच्या निधनानंतर 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' चर्चेत
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. हा पहिलाच मृत्यू नाहीतर या आधी अनेकांनी या ठिकाणी जीव गमावला आहे. अपघात झाल्यास वाहतूक कोंडीमुळे या मर्गावर रुग्णवाहिका पोहचण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार करणं शक्य होत नाही. त्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त असते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




