
पुणे : राज्यात ४ ते ९ मार्च आणि १५ ते १९ मार्च या काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २५ जिल्ह्यांतील एक लाख ३९ हजार २२२ हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बी पिके, फळपिके आणि पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे पुढील दोन दिवसांत पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत.
पंचनामे करून संबंधित अहवाल राज्य सरकारला पाठविला जाईल. बाधितांना नियमानुसार मिळणारी मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल. केंद्र सरकारची मदत घ्यावयाची ठरल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) विभागाचे पथक येऊन तपासणी करेल, असे कृषी संचालक, (विकास आणि विस्तार) विकास पाटील यांनी सांगितले. कृषी खात्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने पंचनामा झालेल्या बाधित क्षेत्राची जिल्हानिहाय माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३८२१ हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्याखालोखाल जालन्यात १५०८० हेक्टर आणि नगर जिल्ह्यात १२१९८ हेक्टर, तर बीडमध्ये ११३५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.लातूर जिल्ह्यात ११७९५ हेक्टर, धुळय़ात ९०१७ हेक्टर, जळगावात ९५२९ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७७६२ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यवतमाळमध्ये ६५३९ हेक्टर, हिंगोलीत ५६०४ हेक्टर, नाशिकमध्ये ४२७५ हेक्टर, वाशिमध्ये ४९८१ हेक्टर, बुलढाण्यात ३१४७ हेक्टर, पालघरमध्ये २०१७ हेक्टर, नंदुरबारमध्ये १८१४ हेक्टर, सोलापुरात ३९७७ हेक्टर, अमरावतीत १५१७ हेक्टर, परभणीत २४०० हेक्टर, अकोल्यात ६४३ हेक्टर, साताऱ्यात ४८४ हेक्टर, पुण्यात ५७९ हेक्टर, ठाण्यात ११७ हेक्टर आणि वध्र्यात सर्वात कमी ८६ हेक्टरवरील विविध पिकांची अतोनात हानी झाली आहे.
’ अवकाळीच्या पहिल्या (४ ते ९ मार्च) तडाख्यात ३८,६६४ हेक्टर आणि १५ ते १९ मार्च या दुसऱ्या तडाख्यात एक लाख ५५८ हेक्टरवर नुकसान.
’ काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डािळब, केळी, पपईची मोठय़ा प्रमाणावर हानी.
’ ज्वारीचा कडबाही (चारा) भिजला, दर्जा खालावल्यामुळे जनावरांच्या वर्षभराच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर.
‘येत्या दोन दिवसांत पंचनामे करू’
मुंबई : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. येत्या दोन दिवसांत ते काम पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. मदतीला होणाऱ्या विलंबावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत सभात्याग केला.
संप काळातही कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास मदत केली. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे तीन दिवसांत बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले जातील. – विकास पाटील, कृषी संचालक, विकास आणि विस्तार
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




