
पुणे : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या कष्टातुन मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा भरविली. मात्र आता याच भिडेवाड्याची दुरावस्था झाली असून तो मोडकळीस आला आहे.
भिडेवाड्याचे जतन करण्यासाठी संघटनांकडून सातत्याने आंदोलने केली जात होती. अखेर राज्य सरकारच्या गुरुवारी जाहीर झालेल्या अंर्थसंकल्पामध्ये भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. दरम्यान, त्यासाठी आत्तापर्यंत झटणाऱ्या विविध संघटनांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.
भिडे वाडा जतन करुन त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती, भिडे वाडा बचाव कृती समिती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्यासह विविध सामाकि संस्था, संघटनांकडून मागील काही वर्षांपासून सातत्याने आंदोलने केली जात होती.
मात्र भिडे वाड्यासाठी राजकीय व्यक्तींकडून आश्वासनांपलिकडे काही प्राप्त होत नसल्याची कैफियत विविध संघटनांकडून मांडली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्यात यासंदर्भात बैठक घेऊन राष्ट्रीय स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यासाठी 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतुद करीत असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
"भिडेवाड्यासाठी आताही जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 कोटी रुपये पडून आहेत. केवळ पैशांच्या घोषणा करुन उपयोग नाही, तर भिडेवाड्याचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्याचे टायटल क्लेअर, भाडेकरुंचा प्रश्न प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडवून स्मारकाचे काम सुरु व्हायला पाहीजे. त्यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक गरजेची आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ पैशांच्या घोषणा करणे योग्य नाही.''
नितीन पवार, निमंत्रक, मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती.
"" रिपब्लिकन पक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी आमच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांनी मोर्चे, आंदोलने केली.या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात भिडे वाडा स्मारकासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद केली. त्याचे आम्ही स्वागत करतो.''
परशुराम वाडेकर, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




