
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात शुक्रवारी (ता. १०) विविध संघटनांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
मुख्य मिरवणूक मार्ग
शिवजयंतीची मुख्य मिरवणूक भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून रामोशी गेट चौक, नेहरू रस्त्याने ए. डी. कॅम्प चौक, संत कबीर चौकातून नाना चावडी चौकी, अरुणा चौक, नाना पेठ चौकी, अल्पना टॉकीज, डुल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद चौक, सोन्या मारुती चौक, फडके हौद चौकातून लाल महालापर्यंत जाणार आहे.
मुख्य मिरवणूक मार्ग पर्यायी मार्ग
नेहरु रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यानंतर पॉवर हाऊसकडून सेव्हन लव्हजकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कादर चौक- क्वार्टर गेट चौक, जुना मोटार स्टॅन्डमार्गे जावे अथवा पॉवर हाऊस ते समर्थ पोलिस ठाणे ते शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट या मार्गाचा वापर करावा. तसेच, सेव्हन लव्हज चौकाकडून पॉवर हाऊसकडे जाणाऱ्यांनी बाहुबली चौक राजसबाई गंगाळे पथ-जुना मोटार स्टँडमार्गे जावे.
लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणाऱ्यांनी नेहरू रोड- पॉवर हाऊस चौक- अपोलो टॉकीज- फडके हौद-जिजामाता चौकमार्गे जावे. तसेच, देवजीबाबा चौकाकडून मीठगंज चौकमार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्यांनी देवजीबाबा चौक ते दारुवाला पूल-अपोलो सिनेमा ते पॉवर हाऊस चौकातून नेहरु रस्त्याचा वापर करावा.
गणेश रस्त्यावरील वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजीरोड मार्गे गाडगीळ पुतळा, बुधवार चौकमार्गे इच्छितस्थळी जाईल. मिरवणूक मोती चौक, फडके हौद चौकापुढे गेल्यानंतर वाहनचालक केळकर रस्त्याने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिरमार्गे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार अप्पा बळवंत चौक, बुधवार चौकातून वळून बाजीराव रस्त्याने, शिवाजी रस्तामार्गे इच्छितस्थळी जातील.
शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. तसेच, स.गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे. मिरवणुकीच्या मार्गांवर दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी आहे.
मुख्य मिरवणुकीव्यतिरिक्त शहरात लष्कर, खडकी भागात तसेच इतर भागात मिरवणुका निघणार आहेत. त्याठिकाणीही मिरवणूक संपेपर्यंत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत.
लष्कर भागातील मिरवणूक
मिरवणूक मार्ग - खान्या मारुती चौक येथून ट्रायलक हॉटेल चौक, न्यू मोदीखानामार्गे मुफ्ती चौकातून उजवीकडे वळून कुरेशी मशीद, सेंट्रल स्ट्रीटने भोपळे चौक, सेंट्रल स्ट्रीट चौकी, आसुडखाना चौक येथे मिरवणूक विसर्जित होईल.
खडकी भागातील मिरवणूक
मिरवणूक मार्ग - शिवाजी पुतळा खडकी बाजार येथून सुरु होऊन कॅन्टोमेंट हॉस्पिटल चौक, श्रीराम मंदिर, आसुडखाना चौक, हुले रोडने नवी तालीम चौक, गोपी चौक, आंबेडकर चौक, टिकारा चौक, डी.आर. गांधी चौकातून शिवाजी पुतळा येथे विसर्जित होईल.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




