पुणे : शासनाकडून घेतलेल्या जमीनीवर घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरीकांकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना संबंधित ठिकाणी घरे न देता दोघांनी सभासद व शासनाची तब्बल 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात सोसायटीच्या अध्यक्षासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास दत्तात्रय गोटे (वय 70, रा.शिवणे, मुळ रा. शिरुर), गणेश बजरंग माने (वय 42, रा.जोशी वाडी, शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिपक अशोक वेताळ (वय 40, रा.मोशी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे, तर अंबादास गोटे हा बांधकाम व्यावसायिक तर, माने हा नोकरदार आहे. गोटे हा रामनगर सहकारी गृहरचना संस्थेचा अध्यक्ष, तर माने हा सचिव आहे.
त्यांनी वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरामध्ये 1990 मध्ये नागरीकांना घरे बांधण्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे साडे चार एक जमीन घेतली होती. त्यासाठी त्यांनी फिर्यादी व त्यांच्यासह अन्य काही व्यक्तींना संबंधित ठिकाणी घरे बांधून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून 1990 पासून फिर्यादी व अन्य 218 सभासदांकडून पैसे घेतले. दरम्यान, संबंधित जमीनीवर 396 सदनिका बांधून त्या सोसायटीच्या सभासदांना न देता, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्याच व्यक्तींना विकल्या.
त्याद्वारे सोसायटीचे मुळ सभासद व राज्य शासन यांची सुमारे 200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. गोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासनास व न्यायालयास वेळोवेळी खोटी माहिती देऊन त्यांचीही दिशाभुल केली. या गुन्ह्यात गोटे यास त्याच्या अन्य नातेवाईक व इतर व्यक्तींनीही मदत केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असा अर्ज फिर्यादीने पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिला होता. त्यानुसार, संबंधित अर्जाची चौकशी करुन वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे पण वाचा-
शहर
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुणे: पाटील इस्टेट ते संचेती हॉस्पिटल रस्ता पूर्ववत सुरू करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार) मागणी
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
महाराष्ट्र
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
- पुणे: भरधाव 'पीएमपी' बस दुकानात शिरली; चालकाचा 'ब्रेक फेल'चा दावा फोल?
गुन्हा
- पुणे पोलिसांचा हिसका: खंडणी मागणाऱ्या गुंडांची पिंपरी-चिंचवडमध्ये धिंड; परिसरात दहशत पसरवणाऱ्यांना अद्दल घडवली
- अमरावती रेशन घोटाळा: कोट्यवधींच्या धान्य अपहारप्रकरणी दोन पुरवठा निरीक्षकांवर गुन्हे दाखल; गाडगेनगर पोलिसांत एफआयआर
- फलटण (सातारा): सावकारी पाश आणि मानसिक छळाने घेतला बळी; फलटणमधील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या, ६ जणांवर गुन्हा दाखल
- मुंबई: "हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच आवडतात"; अश्लील व्हिडिओ पाठवून तरुणीला त्रास देणाऱ्या अशरफला बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

पाषाणमध्ये धमकावून ४० हजारांची लूट, तर बिबवेवाडीत उपाहारगृहातून तब्बल २.३० लाखांची रोकड चोरी!
‘The Bollywood Beat’ बॉक्स ऑफिसचे विक्रम, सुपरस्टार्सचे आणि मोठ्या चित्रपटांच्या धमाकेदार अपडेट्स!
पोलिस भरती झाल्याचा बनाव करून २६ वर्षीय तरुणाने कुटुंबासह संपूर्ण समाजालाच फसवलं. #pune
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




