Pune Crime : खडकी परिसरात तीन वर्षीय बालिकेचा खून

पुणे - खडकी परिसरात एका तीन वर्षीय बालिकेचा खून करून तिचा मृतदेह एका मैदानाच्या कडेला फेकून दिल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी रेल्वे स्टेशनसमोरील मैदानाच्या कडेला एका बालिकेचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना कळविली. त्यावरून खडकी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बालिकेस रुग्णालयात दाखल केले. या बालिकेची अद्याप ओळख पटलेली नाही.

तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात येत आहे. या मुलीचा गळा दाबून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतु वैद्यकीय तपासणीनंतर खुनाचे कारण स्पष्ट होईल. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *