पुण्यात विमानाने येऊन आयफोन चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ३० लाखांचे ३९ मोबाइल जप्त

पुणे - अधिक माहितीनुसार, नगररोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोबाइल चोरी होत असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. त्यानुषंगाने पोलिसांचे एक पथक कार्यक्रमस्थळी गस्त घालत होते. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश शेवाळे यांना असद महंमद हा संशयितरीत्या फिरताना दिसला. त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आम्ही कार्यक्रमामध्ये मोबाइल फोन चोरी करण्यासाठी दिल्ली येथून आलो असून, माझे साथीदार पुणे स्टेशन येथील मीलन हॉटेलमध्ये उतरल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या चार साथीदारांना हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चोरीचे महागडे मोबाइल मिळाले.

ही कारवाई पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, संगीता माळी, उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, समू चौधरी, कर्मचारी सचिन जाधव, अविनाश शेवाळे, सचिन कदम, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण यांच्या पथकाने केली आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *