Pune Crime : चालत्या बसमध्ये कंडक्टरकडून तरुणीचा विनयभंग; आरोपीला अटक

पुण्यामध्ये चालत्या बसमध्ये कंडक्टरने २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी या कंडक्टरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत घडली. पीडित तरुणी पीएमपीएलने प्रवास करत होती. यावेळी बस मधील कंडक्टरने तिच्याशी लगट केली. ही घटना घडताच पीडित महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.

हा सगळा प्रकार दाते बस स्टॉप सहकारनगर ते के के मार्केट धनकवडी या दरम्यान घडला. पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत संबंधित पीएमपीएल बस कंडक्टरला ताब्यात घेऊन रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. विश्वनाथ ठाकरे (४१) असे या बस कंडक्टर चे नाव आहे. पोलिसांकडून आधिक तपास सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *