Pune Crime : केळीचे भाव कमी केले नाही म्हणून टोळक्याने तोडले विक्रेत्याचे नाक

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून केळी विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील गोखलेनगर परिसरात ही घटना शुक्रवारी दुपारीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी ५-६ अज्ञात तरुणांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

शुल्लक कारणावरून ग्राहक आणि केळी विक्रेत्यामध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. केळीचे भाव कमी केले नाही म्हणून टोळक्याने विक्रेत्याच्या नाकाचे हाड तोडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेबाबत केशव आंद्रे (२१) यांनी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून ५ ते ६ अज्ञात तरुणांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंद्रे हे मूळचे मुंबईतील घाटकोपरचे आहेत. ते पुण्यात गोखलेनगर या भागात केळी विक्रेता म्हणून व्यवसाय करतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ५-६ तरुण फिर्यादी यांच्या केळीच्या हातगाडीवर आले आणि केळी मागितली.

त्यांनी भाव कमी करण्याची मागणी केली असता विक्रेत्याने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून या टोळक्याने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत या तरुणांनी केळी विक्रेत्याच्या नाकावर मारले असता त्यांच्या नाकाचे हाड मोडले आणि त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी ४-५ अज्ञात तरुणांवर भारतीय दंडात्मक कलम १४३,१४७,३२५, १४८,१४९ अन्वये चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *