Shahaji Bapu Patil: मोठी बातमी! शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

सांगोल्याचे  शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीला अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाजरा गावा जवळ आज दुपारी अपघात झाला आहे. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तालुक्यातील नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस गाडीचा ताफा होता. त्यातील एका गाडीचा आणि मोटार सायकलचा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सांगोला पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. असाच कार्यक्रम करुन येताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *