Satyajeet Tambe : विजयाचा आनंद पण विजयोत्सव साजरा करणार नाही; कार्यकर्त्यासाठी तांबे भावूक

नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे. सत्यजीत तांबे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. परंतु मानस पगार या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निधानाने आनंदावर दुःखाचं सावट पडलं आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काहीच वेळात हाती येईल. सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित मानला जातोय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना एक अपघात झाला. त्यामध्ये सत्यजीत तांबे यांचे कार्यकर्ते मानस पगार यांचा मृत्यू झाला नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आज रात्री सत्यजीत तांबे यांनी मानस पगार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी माध्यमांशी बोलतांना सत्यजीत तांबे म्हणाले की, मानस पगार विचारांशी निष्ठावान असलेला कार्यकर्ता होता. खंबीरपणे तो माझी बाजू मांडत होता. अनेक वर्षे आम्ही सोबत काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या जाण्याचं दुःख आहे.

'आज विजयाचा आनंद असला तरी माणूस जाण्याचं दुःख आहे. त्यामुळे आम्ही विजयोत्सव साजरा करणार नाही' अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी माडली आहे.दरम्यान, तिसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे २२ हजारांपेक्षा जास्त मतांच्या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *