Mumbai Crime : किरकोळ वादातून डिलिव्हरी बॉयची हत्या; एक दिवस अगोदर झालं होतं भांडण

भाईंदर : मिरा रोड येथे एक वीस वर्षीय तरुणाची सायंकाळी धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेले. हत्या झालेला तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.डिलिव्हरीचं काम करणारा अंकुश राय (20) हा मिरा रोड येथील जांगिड सर्कल येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उभा असताना चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला व धारदार शस्त्राने त्याला भोसकले. त्यांनतर आरोपींनी तिथून पलायन केलं.

या घटनेत सुरुवातीला गंभीर जखमी झालेल्या अंकुशला नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अंकुशचं एक दिवस अगोदर काही जणांशी भांडण झालं होतं. त्या घटनेचा हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास मिरा रोड पोलिस करत आहेत.या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली होती. मागच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि परिसरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाच मिरा रोड पोलिस कसून तपास करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *