Koregaon Bhima प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना याबाबत नोटीस बजावली आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

कोरेगाव भीमा मध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय हे जाणून घेतलं जाणार आहे. कोरेगाव भीमा प्रकरण घडले त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. तर सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते.

या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार यांचीही आयोगासमोर चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदार या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर ही चौकशी होणार आहे.21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे. हर्षाली पोतदारची 21 ते 22 जानेवारी, डॉ शिवाजी पवार यांची 21 ते 23 जानेवारी, विश्वास नांगरे पाटील 24 ते 25 जानेवारी आणि सुवेझ हक यांची 24 ते 25 जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *