
दिल्लीच्या NCR मध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले आहेत. जम्मू काश्मीरपर्यंत हादरे बसले आहेत .तिथे वास्तव्य करणाऱ्या लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इती आहे. तर भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानातील हिंदूकुश भाग आहे. अद्याप या भूकंपाच्या धक्क्यामुळे जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या या तीव्र झटक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याआधीही दिल्लीतल्या NCR मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
दिल्ली एनसीआर भूकंपाच्या संवेदनशील भागात येतं. या भागात जर मोठा भूकंप झाला तर प्रचंड नुकसान आणि तेवढीच प्रचंड जिवीतहानीही होऊ शकते. हे नुकसान नेमकं किती असेलयाची कल्पना करणंही कठीण आहे. लोक आज झालेल्या घटनेमुळे दहशतीखाली आहेत.
याआधी ३१ डिसेंबरच्या रात्रीही याच भागात भूकंपाचे झटके बसले होते. १ जानेवारीला रात्री उशिरा मेघालय नोंगपोहमध्ये रिश्टर स्केलवर ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळीही दिल्ली हादरली होती.
भूकंप अभ्यासकांचं हे म्हणणं आहे आपल्या देशातला ५९ टक्के भाग हा भूकंप रिस्क झोनमध्ये येतो. देशातल्या पाचव्या झोनला सर्वात भयंकर आणि सक्रिय मानलं जातं. या झोनमध्ये येणाऱ्या राज्यांमध्ये भूकंपामुळे अतोनात नुकसान होऊ शकतं. हा पाचवा आणि सर्वात भयंकर झोन आहे जम्मू काश्मीरचा भाग, हिमाचल प्रदेशातला पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरामधलं कच्छचं रण, बिहारचा उत्तर भाग आणि भारताची पूर्वोत्तर राज्यं, त्याचप्रमाणे अंदमान आणि निकोबार ही बेटंही.
चौथ्या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीरचा उर्वरित भाग, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे उर्वरित भाग, हरियाणा, पंजाबचा काही भाग, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचा छोटा हिस्सा हे भाग येतात.
शहर
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुणे: पाटील इस्टेट ते संचेती हॉस्पिटल रस्ता पूर्ववत सुरू करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार) मागणी
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
- पुणे: भरधाव 'पीएमपी' बस दुकानात शिरली; चालकाचा 'ब्रेक फेल'चा दावा फोल?
महाराष्ट्र
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
- पुणे: भरधाव 'पीएमपी' बस दुकानात शिरली; चालकाचा 'ब्रेक फेल'चा दावा फोल?
- रेल्वे प्रवाशांना उन्हाळी सुट्टीत फटका: देवगिरी, नंदिग्राम एक्स्प्रेस मार्गात बदल; राज्यराणी एक्स्प्रेस अंशतः रद्द
गुन्हा
- अमरावती रेशन घोटाळा: कोट्यवधींच्या धान्य अपहारप्रकरणी दोन पुरवठा निरीक्षकांवर गुन्हे दाखल; गाडगेनगर पोलिसांत एफआयआर
- फलटण (सातारा): सावकारी पाश आणि मानसिक छळाने घेतला बळी; फलटणमधील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या, ६ जणांवर गुन्हा दाखल
- मुंबई: "हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच आवडतात"; अश्लील व्हिडिओ पाठवून तरुणीला त्रास देणाऱ्या अशरफला बेड्या
- सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा डाव उधळला; RPF पथकाची सतर्कता, ९ महिला गुन्हेगारांना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




