
पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सीओईपीचे माजी विद्यार्थी आशिष अचलेरकर यांनी ८.२५ कोटींची देणगी दिली आहे. या निधीतून दरवर्षी १०० ते १५० गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार असून, सीओईपीला आजवर मिळालेल्या देणग्यांतील ही सर्वांत मोठी देणगी ठरली आहे.
आशिष अचलेरकर यांचे अचरेलरकर फाऊंडेशन आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत ८.२५ कोटींची (१ मिलियन अमेरिकन डॉलर्स) देणगी सीओईपीला देण्यात आल्याची घोषणा बुधवारी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुल सुतावणे, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे मोहित गुंदेडा, सुरुची वाघ, प्रा. सुजीत परदेशी, प्रा. सुधीर आगाशे आदी या वेळी उपस्थित होते. आशिष सीओईपीतून २००० साली उत्तीर्ण झाले. सध्या अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या आशिष यांची ‘नीअरयू’ ही कंपनी आहे. प्रा. सुतावणे म्हणाले, की आशिष यांनी दिलेली देणगी ही सीओईपीला मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे. या देणगीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मदत होऊ शकेल. माजी विद्यार्थी करत असलेल्या कामाचा अभिमान आहे. या देणगीमुळे अनेक माजी विद्यार्थ्यांना पुन्हा सीओईपीशी जोडले जाण्याची प्रेरणा मिळेल.
माजी विद्यार्थी संघटना तीन वर्षांपूर्वी नव्याने कार्यान्वित केली. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याचे प्राध्यापकांकडून कळले. त्यातून स्टुडंट सपोर्ट क्लबची कल्पना पुढे आली. स्टुडंट सपोर्ट क्लबच्या माध्यमातून परदेशात कार्यरत असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी मदत केली. दोन वर्षे विद्यार्थ्यांना मदत केली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत शंभर कोटींचा निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन आणि लॅपटॉप यांची चिंता करावी लागणार नाही, असे मोहित गुंदेचा यांनी सांगितले.कोट सीओईपीतील महत्त्वाच्या उपक्रमासाठी माझ्या परीने हातभार लावता आल्याचा आनंद आहे. शिक्षण हा माणसाच्या उन्नतीचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. आर्थिक योगदान हाच मदतीचा एकमेव मार्ग नाही. त्यामुळे ही देणगी ही केवळ सुरुवात आहे. विद्यार्थ्यांना अन्य काही अडचणी असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे.– आशिष अचलेरकर, माजी विद्यार्थी
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




