
मुंबई : प्रोजेक्ट ७५ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील फ्रेंच बनावटीच्या पाचव्या वागीर या पाणबुडीचा ताबा माझगाव डॉक लि. कडून आज नौदलाकडे सोपवण्यात आला. आता ही पाणबुडी यथावकाश नौदल ताफ्यात समाविष्ट करून घेतली जाईल. या पाणबुडीचा ताबा देण्याच्या व स्वीकारण्याच्या कागदपत्रांवर माझगाव डॉक लि. च्या व नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यापूर्वी या प्रकारातील कलवरी, खांदेरी, करंजा आणि वेला या पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात आहेत. तर सहाव्या वागशीर या पाणबुडीचे जलावतरण यावर्षी एप्रिलमध्ये झाले असून ती आता कठोर समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.
आज नौदलाच्या ताब्यात दिलेल्या वागीर या पाणबुडीचे दोन वर्षांपूर्वी जलावतरण झाले होते. या कालावधीत तिच्या कठोर समुद्री चाचण्या झाल्या. युद्ध तसेच अन्य सर्व परिस्थितीत समर्थपणे काम करण्यास ती सज्ज असल्याचे सिद्ध झाल्यावर आज तिचा ताबा नौदलाला देण्यात आला. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्टेल्थ म्हणजे शत्रूच्या पाणबुडीशोधक सोनार यंत्रणेला चकवणारी आहे. कमीत कमी आवाज करणे, केलेला आवाज शोषून घेणे तसेच एरोडायनामिक सारख्या हायड्रोडायनामिक आकारामुळे पाण्याला कमीत कमी प्रतिरोध व त्याचा कमीत कमी आवाज करणे या वैशिष्ट्यांमुळे या पाणबुडीचा सुगावा शत्रूला सहज लागत नाही.
या पाणबुडीवर असलेले पाणबुडीविरोधी टॉर्पेडो आणि शत्रूच्या युद्धनौकांवर डागण्यात येणारी क्षेपणास्त्रे पाण्याखालून तसेच पाण्याच्या वरूनही डागता येतात. या प्रकारच्या पाणबुड्या शत्रूच्या पाणबुड्यांवर तसेच युद्धनौकांवर हल्ला चढवू शकतात. त्याचप्रमाणे परिसराची टेहळणी करणे व माहिती मिळवणे, पाणसुरुंग पेरणे आदी कामेही या पाणबुड्या करू शकतात. सर्वात आधी रशियाने बनवलेल्या सिंधुघोष वर्गातील पाणबुड्या भारत वापरत होता. त्यानंतर जर्मन बनावटीच्या शिशूमार वर्गाच्या पाणबुड्या भारतात तयार झाल्या. आता फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिओ पाणबुड्या माझगाव डॉकमध्ये तयार होत आहेत. भारताने नुकतीच मध्यम आकाराची अरिहंत ही अणुपाणबुडी निर्मित केली असून आता माझगाव डॉक, मध्यम आकाराच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीचे डिझाईन आणि बांधकाम करीत आहे. त्याद्वारे स्वदेशी पाणबुडी निर्मिती कार्यक्रमाचा पाया घातला जाईल.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

