
Maharashtra Weather Updates : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशावर मंदोस चक्रीवादळाचं संकट घोघावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात मंदोस चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आता महाराष्ट्रावरही या चक्रीवादळाचे सावट असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, मंदोस चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात १५ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता असून इतर ठिकाणी हवामान कोरडे राहिल, याशिवाय राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
आधीच आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूवर दिसून आला होता. आता या वादळाची दिशा बदलून नैऋत्य झाली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राकडे येणार नाही. तरी सुद्धा राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सकाळपर्यंत मंदोस वादळ आणखी कमजोर होणार असून किमान तापमानात थोडी वाढ होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


