पुणे : बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

पुणे : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत सीमावाद पेटला आहे. मंगळवारी दुपारी कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्लाबोल करत तोडफोड केली आहे. या प्रकराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्रातील सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या नंबरप्लेटवर काळं फासण्यात आलं आहे. हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या आहेत. तसेच कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असं लिहून रंगरंगोटीही करण्यात आली आहे. या प्रकरानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *