
कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यात बुडून बेळगाव शहरातील चार तरुणींचा मृत्यू झाला. किटवाड येथील तरुणांनी तत्परतेने बचाव कार्य केल्याने एका तरुणीला जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे किटवाड धबधब्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंदगड तालुक्यातील किटवाड येथे जलाशयाच्या शेजारी धबधबा आहे. तेथे महाराष्ट्रातील पर्यटकांचा ओढा असतो. तसेच बेळगाव पासून २० किलोमीटर अंतरावर असल्याने सीमाभागातील लोकही येथे नेहमीच हजेरी लावत असतात.
आज सकाळी बेळगाव येथील खंजीर गल्लीतील मुस्लिम समाजातील सुमारे ३० तरुणी किटवाड येथे पर्यटनसाठी आल्या होत्या. धबधब्याचे पाणी प्रवाहित होऊन तयार झालेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांनी स्नान करण्याचे ठरवले होते. पहिली तरुणी खड्ड्यात उतरल्यावर ती बुडू लागल्यावर दुसरीने तिला हात देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाच तरुणी खड्ड्यात बुडाल्या.
हा प्रकार पाहून बाकीच्या तरुणींनी आरडाओरडा केल्यानंतर किटवाड गावातील तरुण ,ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यात उडी मारून बुडालेल्या पाचही तरुणींना वर काढले. बचाव कार्य सुरू असतानाच तरुणींचे नातेवाईक धबधब्याजवळ आले होते. त्यांनी बुडालेल्या तरुणींना बेळगाव येथील रुग्णालयात हलवले. त्यांचे नाव , तपशील समजू शकला नाही. पाच तरुणी बुडाल्याने इतरांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही, असे उपस्थित तरुणींनी सांगितले. तर बचाव करण्यात विजय लाड, महेश हेबाळकर, आकाश पाटील या तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
दरम्यान करोना टाळेबंदी नंतर किटवाड धबधबा हे महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरले आहे. मात्र, तेथे सुरक्षेच्या बोजवारा उडाला आहे. सुरक्षेबाबत कोणतेही फलक नसल्याने पर्यटकांवर अनर्थ ओढवल्याच्या घटना आहेत. आजची घटना ही या सर्वावर कडी करणारी ठरली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




