कोल्हापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी जाळण्याच्या प्रयत्न

कोल्हापुर : महाराष्ट्रातील जागेवर कर्नाटक राज्याचा हक्क सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची प्रतिकात्मक तिरडी जाळण्याच्या प्रयत्नात ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की होण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. महाराष्ट्रातील जत तालुका तसेच सोलापूर जिल्हा या भूभागावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्याने सीमाभागातील मराठी भाषक तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

आज कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा दसरा चौकातून काढली. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांच्या खांद्यावरील तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *