पुणे - पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे विद्यमान सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाळ येत्या रविवारी (ता.१३) संपुष्टात येत आहे. यामुळे पंचायत समित्यांच्या सभापतींना त्यांच्या सरकारी गाड्या परत जमा कराव्या लागणार आहेत. येत्या सोमवारपासून (ता.१४) पंचायत समित्यांच्या कारभार हा प्रशासकांच्या हाती जाणार आहे. आपापल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हेच पंचायत समितीचे प्रशासक असणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून शुक्रवारी (ता.११) रात्री उशिरापर्यंत याबाबतचा आदेश प्राप्त झालेला नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.
देशातील पंचायतराज संस्थांना अधिकाधिक स्वायत्तता देण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने ७३ वी घटनादुरुस्ती केली आहे. या घटनादुरुस्तीतील नियमांची अंमलबजावणी १९९४ पासून केली जात आहे. या घटनादुरुस्तीतीमधील तरतुदीनुसार पंचायतराज संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मुदतवाढ देता येत नाही. परिणामी पंचायत समित्यांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात असलेल्या कायदेशीर अडचणी आणि मुदतीत निवडणुका घेणे अशक्य असल्याने या संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती करण्याशिवाय सरकारपुढे अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे (ओबीसी) आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत ओबीसीसाठी त्यांचे पूर्वीचे २७ टक्के आरक्षण देता येत नाही. या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण कायम ठेवता यावे, या उद्देशाने राज्य सरकारने कोरोनाचे कारण पुढे केले असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. यामुळे हे आरक्षण पूर्ववत होईपर्यंत या निवडणुका टप्याटप्प्याने किमान सहा महिने पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर किमान सहा महिने प्रशासक राहणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तविला आहे.हे पण वाचा-
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

सोशल मीडियावरील ओळखीतून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग, धमक्या आणि पळवून नेण्याचा प्रयत्न!
पाषाणमध्ये धमकावून ४० हजारांची लूट, तर बिबवेवाडीत उपाहारगृहातून तब्बल २.३० लाखांची रोकड चोरी!
‘The Bollywood Beat’ बॉक्स ऑफिसचे विक्रम, सुपरस्टार्सचे आणि मोठ्या चित्रपटांच्या धमाकेदार अपडेट्स!
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




