पुणे - खासगी कंपनीतर्फे शहरात इ-बाईक स्टेशन (e-bike station) उभारण्यासाठी तब्बल ७८० ठिकाणी जागा दिली जाणार आहे. मात्र, या जागा देताना जागा वाटप नियमावलीला फाटा देऊन त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर (Standing Committee) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने यावर विरोधकांनी आक्षेप घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच तासभर यावरून स्थायी समितीचे कामकाज ठप्प झाल्याने अखेर यावर निर्णय न घेता प्रस्ताव पुढे घेण्यात आला.
वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इ-व्हेईकलची चर्चा आहे. शहरात नागरिकांना इ-बाईक उपलब्ध व्हावी यासाठी निविदा मागवली होती, त्यामध्ये मे. व्हिट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीला हे काम देण्यात आहे. त्यासाठीचा प्रस्ताव आज (ता. ११) आयत्यावेळी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला.
या कंपनीतर्फे शहरात ७८० जागी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्याठिकाणी जाहिरात करण्याचे हक्कही या कंपनीला दिले जाणार आहेत. त्यासाठी आकाशचिन्ह विभागातर्फे वर्षाला २२२ चौरस मीटर इतके शुक्ल आकारले जाणार आहे. ही कंपनी प्रत्येक जागेसाठी वर्षाला सुमारे १ लाख रुपये भाडे, तसेच सर्व स्टेशनसाठी लमसम रक्कम तीन लाख आणि एकूण नफ्याच्या २ टक्के नफा महापालिकेला दिला जाणार आहे. या जागा पुढील ३० वर्षासाठी दिली जावी असा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला.
हा विषय मंजूर केला जाणार होता, पण राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे व अश्विनी कदम यांनी याप्रस्तावार प्रशासनाकडून माहिती मागवली. पण त्याठिकाणी माहिती देण्यासाठी अधिकारी नसल्याने त्यांना बोलावून घेण्यात आले. महापालिका ७८० जागा देणार असताना त्यासाठी जागा वाटप नियमावलीनुसार भाडे का निश्चीत केले नाही असा प्रश्न केला. त्यावर पहिल्या टप्प्यात ५०० जागा निश्चीत केल्या जाणार आहेत व त्यापैकी २०० ठिकाणीच चार्जिंग स्टेशन केले जाणार आहे असे उत्तर देण्यात आले. मात्र, हा संयुक्त प्रकल्प असल्याचे सांगितले जात असले तरी यात महापालिकेचा फायदा नाही. हे २०० चार्जिंग स्टेशन शहरात कोणत्या भागात असतील याचीही माहिती प्रशासनाकडे नाही. सुमारे एक तास या प्रस्तावावरून प्रश्न व उत्तरे सुरू होते. सत्ताधारी भाजपला हा प्रस्ताव मंजूर करायचा होता, पण यामध्ये त्रुटी असल्याने हा विषय पुढच्या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर घेण्याचे आदेश देण्यात आले.
विशाल तांबे म्हणाले, ‘शहरात खासगी कंपनीतर्फे चार्जिंग स्टेशन उभारले जात असताना त्या जागांचे वाटप जागा वाटप नियमावलीनुसार होणे आवश्यक आहे. पण प्रशासनाने त्याचा विचार केला नाही. हा प्रकल्प संयुक्त आहे असे प्रस्तावात कुठेही नमूद केले नाही. त्यामुळे यामध्ये महापालिकेचे नुकसान होणार असल्याने त्यास विरोध केला.
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘इ-बाईकच्या चार्जिंग स्टेशनचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर आला. पण विरोधकांच्या प्रश्नांची पूर्ण उत्तरे न मिळाल्याने हा विषय कार्यपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




